मुंबई

धनगर समाजाचा निर्धार

CD

आरक्षणासाठी धनगर समाज एल्गार
२१ जानेवारीला आझाद मैदानात आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलन अधिक तापत चालले आहे. संविधानाच्या क्रमांक ३६ नुसार आरक्षणाचा स्पष्ट हक्क असतानाही, गेल्या अनेक दशकांपासून धनगर समाज शासनाच्या अन्यायकारक वागणुकीमुळे हक्कापासून वंचित आहे. यासाठी २१ जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन छेडण्यात येणार असून, आरक्षणाची ‘आझादी’ मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार धनगर आरक्षण मुक्तिसंग्रामचे दीपक बोऱ्हाडे यांनी केला.
दीपक बोऱ्हाडे रविवारी (ता. १) ठाण्यात आले होते. जांभळी नाका येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला वंदन करून त्यांनी समाजबांधवांशी संवाद साधला. या वेळी धनगर समाजाचे नेते महादेव अर्जुन, शंकर कोळेकर, मल्लिकार्जुन पुजारी, अ‍ॅड. नानासाहेब मोटे, अ‍ॅड. प्रकाश पुजारी, निहारिका कोंदले, दीपक देवकाते, राजेंद्र शेळके, राजू जांगळे, डॉ. अरुण गावडे, महेश गुंड, प्रसाद वारे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. धनगर प्रतिष्ठान यांच्या वतीने बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.
संविधानानुसार ३६ क्रमांकावर धनगर समाजाला आरक्षण मंजूर असतानासुद्धा अनेक वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे. शेकडो आंदोलने, उपोषणे, हजारो बांधवांवर दाखल गुन्हे असे असतानाही लढा सुरू आहे. जालना येथे १६ दिवसांचे उपोषण प्रकृती बिघडल्याने स्थगित केले असले तरी आता हा लढा अधिक तीव्र झाला आहे, असे बोऱ्हाडे यांनी सांगितले. धनगर आरक्षण मुक्ती संग्राम लढा जालना येथून सुरू झाला असून, मुंबईतील आझाद मैदानात आरक्षणाची ‘आझादी’ मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, त्यामुळे सर्व समाजबांधवांनी २१ जानेवारी आझाद मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन दीपक बोऱ्हाडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update :धावत्या ट्रेनमधून वैतरणा नदीत पडला तरुण, सतर्कतेमुळे जीव वाचला

हॉटेलमध्ये चालवलं जायचं सेक्स रॅकेट, ५०० तरुणी, १०० ग्राहक; दलाल २० हजार घेऊन तरुणींना द्यायचे ५ हजार

SCROLL FOR NEXT