मुंबई

घटत्या पशुधनाची वाढती चिंता

CD

वज्रेश्वरी, ता. ३ (बातमीदार) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुधनाची संख्या गेल्या काही वर्षांत सातत्याने कमी होत आहे. पशुधनातील ही घट केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर शेतीव्यवस्था आणि दुग्धउद्योगासाठीही धोक्याचा इशारा असल्याचे चित्र समोर येत आहे. भविष्यात सेंद्रिय खताचा तुटवडा, स्थानिक दूध उत्पादनात घट आणि त्याऐवजी आयात केलेल्या दूध पावडरचा वापर वाढण्याच्या शक्यतेमुळे परिस्थिती गंभीर बनू लागली आहे.

मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पूर्वी कोटींच्या संख्येत पशुधन होते. येथून दररोज लाखो लिटर दूध मुंबई बाजारपेठेत पाठवले जात असे. स्थानिक शेतीतही गायी-म्हशींपासून मिळणाऱ्या शेणखताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झाली होती. विशेषतः वाडा कोलम भाताला सेंद्रिय खतामुळेच प्रसिद्धी मिळाली होती.
दर पाच वर्षांनी करण्यात येणाऱ्या सरकारी पशुगणनेत पशुधनातील घट स्पष्टपणे दिसून येते. २०१७-१८ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात तीन लाख ९६ हजार पशुधन होते, तर २०२०-२१ च्या गणनेत ही संख्या घटून तीन लाख ८६ हजार ३७ वर आली. म्हणजे केवळ पाच वर्षांत ८७ हजारांहून अधिक पशुधनाने घट झाली. अद्याप २०२३-२४ ची पशुगणना पूर्ण झालेली नसली, तरी प्राथमिक आकडेवारीनुसार यंदाही पशुधनातील घट चिंताजनक असल्याचे समोर येत आहे.

९८ टक्के गायरानावर अतिक्रमण
ब्रिटिशकाळात गावांच्या एकूण क्षेत्रापैकी १० टक्के जमीन गायरान (गुरे चारण्यासाठी राखीव) म्हणून ठेवण्यात आली होती. परंतु गेल्या ७५ वर्षांत या गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून आता फक्त २ टक्के क्षेत्र शिल्लक आहे.
गावठाण क्षेत्र उपलब्ध नसल्याने अनेक गावांत नव्या वसाहती गायरान जमिनीवरच वाढत असून याचा पशुपालनावर थेट परिणाम होत आहे.

शहरीकरण व यांत्रिकीकरणाचा परिणाम
* वाढत्या शहरीकरणामुळे आणि चराऊ क्षेत्राच्या घटामुळे अनेकांनी पशुधन सांभाळणे कमी केले आहे.
* शेतीचे वाढते यांत्रिकीकरण, बैलगाड्या-लाकडी नांगर कालबाह्य होणे आणि रोजगार-व्यवसायाकडे वाढता कल यामुळेही पशुधनाची संख्या घसरत आहे.

दुधाळ जनावरांचे वाढते दर
दुधाळ जनावरांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ, खाद्याचे वाढते दर यामुळे दुध व्यवसाय तोट्यात जात आहे. परिणामतः शेतकरी दुधाळ जनावरे कमी करू लागले आहेत, अशी प्रतिक्रिया अकलोलीचे शेतकरी हिरामण पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT