मुंबई

कल्याण शहरात रॅलीद्वारा एच आय व्ही एड्स बाबत जनजागृती...

CD

कल्याण शहरात रॅलीद्वारा एचआयव्ही एड्‍सबाबत जनजागृती
कल्याण, ता. २ (वार्ताहर) ः जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून सोमवारी (ता. १) पालिकेतील वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत जनजागृती रॅली काढण्यात आली होती. एडस् रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही एड्सविरोधात लढा देऊ, नवपरिवर्तन घडवू ही तीन उद्दिष्टे या रॅलीची होती. कृष्णा कुमावत यांच्या नेतृत्वाखाली आयसीटीसी रुक्मिणीबाई रुग्णालय आणि अचिव्हर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याण-डोंबिवली पालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड आणि उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रज्ञा टिके, रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके, एड्स विभागाच्या प्रमुख डॉ. सुलक्षणा त्रिभुवन, वसंत व्हॅली प्रसूतिगृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना रामोळे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पौर्णिमा ढाके, डॉ. महेश भिवंडीकर आणि एआरटी विभागाचे प्रमुख डॉ. राजू लवंगारे व डॉ. अशोक भिडे, रेल्वे विभागातील कॉर्डिनेटर चंद्रकांत देवरे, रुक्मिणीबाई रुग्णालयातील आयसीटीसीच्या सीमा शेजवळ, शैला गायकवाड, शुभांगी ठमके व एआरटीचे विजय घरटे, कविता माळी, अर्चना सोनवणे, शुभांगी प्रभुदेसाई, सीमा आठवले परिघा विधाते व इतर कर्मचारी हजर होते.
हर्षल गायकवाड यांनी संसर्गातून कसे वाचवता येईल यासाठी एचआयव्ही/एड्स या आजारासंबंधी जनजागृती फार गरजेची आहे, असे सांगितले. प्रज्ञा टिके यांनी एचआयव्ही एड्स प्रतिबंधात्मक आणि उपचाराबाबत माहिती दिली.

श्री शक्तीचा एकच नारा-एड्सला करा हद्दपार
या रॅलीमध्ये संयम पाळा, एड्स टाळा, श्री शक्तीचा एकच नारा-एचआयव्ही एड्सला हद्दपार करा, अशा घोषणा देण्यात आल्या, तर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एड्स व मादक द्रव्य या विषयावर पथनाट्य सादर केले. याप्रसंगी सर्वांनी एड्सविषयी शपथ घेतली. या रॅलीत जवळपास ३०० एनएसएस रेड रिबन क्लबचे युवक-युवती आणि इतर स्टाफ मिळून ३५० व्यक्तींनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT