मुंबई

परिवहन सेवेत निष्काळजीपणा उघड : ठेकेदारावर दंडात्मक कारवाई

CD

महापालिकेच्या परिवहन सेवेत त्रुटी
कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई
उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या परिवहन (बस) सेवेतील निष्काळजी थेट प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता तपासण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी सोमवारी सामान्य प्रवाशाप्रमाणे स्वतः बसमध्ये प्रवास करत तिकीट काढून पाहणी केली. या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आढळल्यामुळे महापालिका प्रशासनाने तत्काळ कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करत नोटीस बजावली आहे. या कठोर भूमिकेमुळे परिवहन व्यवस्थेमध्ये शिस्त लागू करण्याची मोहीम सुरू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी सोमवारी (ता. १) नागरिकांच्या दैनंदिन अडचणी स्वतः अनुभवण्यासाठी रूट क्रमांक १०१ (शहाड रेल्वेस्थानक ते कैलाश कॉलनी व्हाया श्रीराम चौक) या बसमार्गावर अचानक प्रवास केला. प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी थेट प्रवाशांमध्ये मिसळून संवाद साधत असल्याने नागरिकही उत्साहित झाले होते.
तपासणीदरम्यान बससेवेत अनेक गंभीर त्रुटी व अनियमितता उघड झाल्या. या त्रुटी अत्यंत गंभीर व दुर्लक्ष दर्शविणाऱ्या असल्याची नोंद घेत महापालिकेने तत्काळ संबंधित विभागास सर्व त्रुटी तत्काळ दूर करण्याचे आदेश दिले आहेत. धीरज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘नागरिकांच्या सुरक्षेशी आणि सुविधेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सेवेत निष्काळजी आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल.’’

-----------------
त्रुटी व अनियमितता
- बसमध्ये अस्वच्छता
- बसमधील नामफलक बंद स्थितीत
- प्रवाशांच्या सुरक्षेसाठीचा ‘फायर एक्स्टिंग्विशर’ अनुपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuvir Khedkar: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर रघुवीर खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; ''मागच्या ५३ वर्षांमध्ये केलेला संघर्ष...''

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

SCROLL FOR NEXT