मुंबई

कर्जाच्या नावाने पोल्ट्री व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

CD

कर्जाचे प्रलोभन दाखवून पोल्ट्री व्यावसायिकाची फसवणूक
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शहापूर, ता. २ (वार्ताहर) : पोल्ट्री व्यवसायाच्या विस्तारासाठी कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून शहापूर तालुक्यातील शेंद्रुण येथील एका पोल्ट्री व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने सुमारे तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
नंदकुमार रत्नाकर (रा. शहापूर) असे तक्रारदार पोल्ट्री व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचा गोठेघर परिसरात कोंबड्यांना खाद्यपुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची ओळख मुरबाड येथील पोल्ट्री व्यावसायिक अनिकेत म्हात्रे यांच्याशी झाली. अनिकेतने नंदकुमार यांना व्यवसायाच्या विस्तारासाठी ३५ लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी अनिकेतने कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी नंदकुमार यांच्याकडून तीन लाख ५० हजार रुपये घेतले. जुलै २०२२ मध्ये अनिकेतने वसई येथील एका वित्तीय संस्थेचे कर्मचारी म्हणून इतर चार आरोपींना नंदकुमार यांच्या कार्यालयात आणले.
नंदकुमार यांची ३५ लाखांची मागणी असताना, जानेवारी २०२३ मध्ये त्यांच्या बँक खात्यावर केवळ १७ लाख १७ हजार रुपये जमा झाले. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने मिळेल, असे आश्वासन अनिकेतने दिले; मात्र पुढील रक्कम मंजूर होणार नसल्याचे वित्तीय संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यानंतर नंदकुमार यांनी मिळालेले कर्ज परत करण्याची तयारी दर्शवली असता, ती रक्कम वसई येथील संस्थेऐवजी ठाणे येथील दुसऱ्या संस्थेत वर्ग करण्यात आली. मे २०२३ मध्ये कर्ज हप्ते थकल्यामुळे नंदकुमार यांना वसईच्या वित्तीय संस्थेकडून नोटिसा येऊ लागल्या. यादरम्यान, अनिकेत म्हात्रेने अंग काढून घेत नंदकुमार यांना मारण्याची धमकी दिली. कर्जाचे हप्ते थकल्याने अखेरीस वित्तीय संस्थेने नंदकुमार यांचे राहते घर सील करण्याची नोटीस बजावली.

पाच जणांविरुद्ध गुन्हा
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, नंदकुमार रत्नाकर यांनी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अनिकेत म्हात्रे, चंद्रप्रकाश शर्मा, ज्योती गुप्ता, अशितोष यादव आणि तेजस गुरव या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदाराने दोषींना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Last Video: आठवणीतले अजितदादा… मनमोकळ्या हास्याचा 'हा' शेवटचा व्हिडिओ अश्रूंमध्ये सोडून गेला

Ajit Pawar Death News LIVE Updates: अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती तालुक्यात व्यवहार ठप्प

Ajit Pawar Death : महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता गमावला... ! सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांनी वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Plane Crash: ''हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं'', प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव

Ajit Pawar Death: अजित पवारच नाही, तर देशातील 'या' नेत्यांनीही विमान अपघातात गमावलाय जीव...

SCROLL FOR NEXT