मुंबई

पडघ्यातील दत्त जंयती ऊत्सवाला १२२ वर्षांची पंरपंरा

CD

पडघा येथील दत्त जयंती उत्सवाला १२२ वर्षांची प्रदीर्घ परंपरा
उत्सवाच्या निमित्ताने ''गुरुचरित्र पारायण'' सोहळ्याचे आयोजन
पडघा, दि. २ (बातमीदार): भिवंडी तालुक्यातील पडघा येथील श्री दत्त देवस्थान मंदिरात साजरा करण्यात येणाऱ्या दत्त जयंती उत्सवाला तब्बल १२२ वर्षांची मोठी परंपरा लाभली आहे. गुजरातच्या कारुळकर यांनी पडघा गाव वसवल्यानंतर १२२ वर्षांपूर्वी एका छोट्या जागेत या उत्सवाची सुरुवात झाली होती, जी आता भव्य-दिव्य स्वरूपात साजरी होते. यंदाच्या १२२ व्या वर्षाच्या निमित्ताने देवस्थानच्या वतीने २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक नागरिक या सोहळ्याचा लाभ घेत आहेत.
गुजरातच्या उंबरगावचे कारुळकर यांनी पडघा गाव वसवल्यानंतर १२२ वर्षांपूर्वी एका छोट्या जागेत श्री दत्त जयंती उत्सवाची सुरुवात झाली. पडघ्यातील ''चाफेकर बंधूंनी'' वास्तू दान दिल्यानंतर येथे पादुकांची स्थापना करून उत्सव सुरू करण्यात आला. १९६० साली राजस्थान येथून श्री गुरु दत्ताची मूर्ती आणून तिची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, त्यानंतर उत्सवाने भव्य रूप धारण केले. २००३ साली उत्सवाचे १०० वे वर्ष (शतकमहोत्सवी) मोठ्या धार्मिक कार्यक्रमांनी व शोभायात्रेने साजरे करण्यात आले होते.

''शत्तसंवरी'' वर्ष
श्री दत्त देवस्थान मंदिर २०२८ साली १२५ व्या वर्षात पदार्पण करत असल्याने, हे वर्ष ''शत्तसंवरी'' वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. यासाठी २०२६ सालापासून नियोजन, व्यवस्थापन आणि रचना करून भव्यदिव्य सोहळा आयोजित केला जाईल, अशी माहिती प्रमुख विश्वस्तांनी दिली आहे. या सोहळ्यासाठी सर्व ज्ञाती बांधव आणि हितचिंतकांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आज दिल्लीत होणार आगमन ; दौऱ्याकडे जगाचे असणार बारीक लक्ष!

आजचे राशिभविष्य - 04 डिसेंबर 2025

Swami Samarth Video: स्वामी समर्थ महाराजांचा गूढ प्रवास! भारत खंडातून फिरताना तयार होतो 'ॐ' आकार... प्रत्येक भक्ताने वाचावी अशी माहिती

Ruturaj Gaikwad: विराटने कशी मदत केली? चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना काय विचार केला, ऋतुराजने सर्वच सांगून टाकलं

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात पिज्जा पराठा ट्राय केलाय का? सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT