मुंबई

सर्विस सेंटरकडून अव्याहत पाण्याचा उपसा

CD

सर्व्हिस सेंटरकडून अव्याहत पाण्याचा उपसा
अनधिकृत नळजोडणी व बोरिंगमुळे पुरवठ्यावर परिणाम

भिवंडी, ता. २ (वार्ताहर) : शहरात पाणी वितरण व्यवस्था आणि पाण्याची गळती शोधण्यात अपयशी ठरलेल्या महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात गाड्या धुणाऱ्या सर्व्हिस सेंटरमध्ये अनधिकृत पाण्याचा उपसा सुरू आहे. यामुळे अनेक भागात पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अनियमित होत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढत आहे.

शहरातील अनेक भागांत अनधिकृत सर्व्हिस सेंटर सुरू आहेत. काही ठिकाणी तर पालिकेच्या पदपथावर आणि रस्त्यावर अतिक्रमण करून ते सुरू आहेत. येथे दिवसभर गाड्या धुण्यासाठी काही ठिकाणी बोरिंगद्वारे तर काही ठिकाणी थेट अनधिकृत नळजोडणी घेऊन पाण्याचा उपसा सुरू आहे. अनेक सर्व्हिस सेंटर रस्त्यावर वाहने धुवत असल्याने रस्त्यावर चिखल होतो, ज्यामुळे पादचारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

महसुलाचे नुकसान
सर्व्हिस सेंटरना दररोज हजारो लिटर पाणी लागत असताना, अनेक सेंटर परवानगी न घेता सुरू आहेत. त्यामुळे त्यांना पाणीपट्टीची आकारणीही होत नाही. नागरिकांच्या हक्काचे पाणी पळवले जात असताना पालिका पाणीपुरवठा विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कारवाईचे आश्वासन
सर्व्हिस सेंटरसाठी पालिका नळजोडणी मंजूर करत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून बोरिंगद्वारे पाण्याचा वापर केला जातो. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी माहिती दिली की, मागील वर्षभरात अनधिकृत नळजोडणी घेतलेल्या आठ सर्व्हिस सेंटरवर कारवाई करून गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आतासुद्धा सर्व्हिस सेंटरमध्ये अनधिकृत नळजोडणी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शाळा उद्या बंद

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT