निवडणुकीच्या आधीच कुलाब्यातील झोपडपट्टी उजळली
सुरक्षिततेच्या दृष्टीने बसवले २५० विजेचे खांब
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः कुलाबा येथील झोपडपट्टीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने विजेचे खांब बसविले आहेत. निवडणुकीच्या आधी वस्त्या विद्युत रोषणाईने उजळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पाची किंमत सुमारे १० कोटी रुपये आहे.
कुलाब्यातील झोपडपट्टींच्या सर्वात अरुंद गल्ल्यांमध्ये एलईडी दिवे बसवण्याचा अभिनव प्रकल्प पालिका आणि बेस्टच्या सहकार्याने सुरू करण्यात आला असून, या प्रकल्पाअंतर्गत सुमारे ५,००० एलईडी दिव्यांचे खांब बसवण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी २,५०० खांब आधीच बसवले गेले आहेत आणि उर्वरित खांब बसवण्याचे काम सुरू असल्याची माहिती माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दिली आहे.
कुलाब्यातील अरुंद गल्ल्यांमध्ये दिवे लावणे हे एक आव्हानात्मक काम होते. हा प्रकल्प शहरभर राबवला जावा, अशी मागणी माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांची आहे. या प्रकल्पांतर्गत गणेशमूर्ती नगर, शिवशक्ती नगर, मच्छीमार नगर यासारख्या झोपडपट्ट्यांमध्ये रोषणाई करण्यात आली आहे.
सुरुवातीला पालिकेने या भागांत सौरऊर्जेवर आधारित दिव्यांचा प्रयोग केला होता, परंतु मर्यादित सूर्यप्रकाशामुळे चार्जिंगची अडचण निर्माण झाली, बॅटरीचे अल्प आयुष्य आणि चोरी यांसारख्या समस्येमुळे पुनर्विचार करावा लागला. परिणामी, पालिका आणि बेस्ट यांनी या दाट लोकवस्तीच्या भागांत एलईडी दिव्यांचे खांब बसवण्यावर भर देण्यात आला.
शहरात इतर वस्त्यांमध्ये हा प्रयोग राबवा
शहरात अशा अनेक दाट लोकवस्तीच्या झोपडपट्ट्या आहेत ज्यांना प्रकाशयोजनेची आवश्यकता आहे. हा प्रकल्प मुंबईच्या इतर भागातही राबवता येईल, असे मत माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे.
गुन्हेगारीला आळा
वाढलेल्या प्रकाशामुळे रहिवाशांना दैनंदिन हालचाली सोप्या झाल्या आहेत. प्रकाशयोजनामुळे सुरक्षा वाढली असून, गुन्हेगारीवरही आळा बसला आहे. त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.