मुंबई

शिक्षणवर्धक ठराव घेणाऱ्या ग्रामपंचायतींचा मनविसेतर्फे गौरव

CD

शिक्षणवर्धक ठराव घेणाऱ्या ग्रामपंचायतींचा मनविसेतर्फे गौरव
पोलादपूर, ता. ३ (बातमीदार) ः रायगड जिल्हा परिषद शाळांमधील घटती विद्यार्थ्यांची संख्या, त्यामुळे निर्माण होणारी शिक्षकांची अतिरिक्तता, तसेच काही ठिकाणी शाळा बंद पडण्याची वेळ या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी पोलादपूर तालुक्यात ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शासकीय शाळांपासून पालकांचा वाढता कल खासगी शाळांकडे वळल्याने या समस्येला अधिक गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणवर्धक ठराव घेणाऱ्या पोलादपूर तालुक्यातील पहिल्या दोन ग्रामपंचायतींना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे रोख २१०० रुपये आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे निवेदन नुकतेच गटविकास अधिकारी पोलादपूर व तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष राकेश उतेकर यांना देण्यात आले.
परभणी जिल्ह्यातील देऊळगाव दुधाटे, नांदेडमधील पोफाळी, सोलापूरमधील जवळा, बीडमधील नांदूरघाट यांसारख्या ग्रामपंचायतींनी घेतलेल्या शिक्षणवर्धक व ऐतिहासिक ठरावांचा संदर्भ देण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना करमाफी जाहीर करून गावातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी दिली. या उपक्रमांपासून प्रेरणा घेत पोलादपूर तालुक्यातही अशीच सकारात्मक बदलाची चळवळ उभी राहावी, हा मनविसेचा उद्देश आहे. मनविसेने जिल्हा परिषद शाळांप्रती विश्वास वाढवण्यासाठी ग्रामपंचायतींनी सक्रिय भूमिका घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. ग्रामपंचायत करमाफीचा ठराव करणाऱ्या पहिल्या दोन ग्रामपंचायतींना मनविसे विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरवणार आहे. हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींनाही प्रेरणा देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन १ डिसेंबर रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती पोलादपूर तसेच तालुका सरपंच संघटना अध्यक्ष राकेश उतेकर यांना देण्यात आले. निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे, शहर अध्यक्ष प्रवीण पांडे, आणि बाटू विद्यापीठ युनिट अध्यक्ष अथर्व शिंदे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Climate Impact: मुंबईकरांनो सावधान! शहर नष्ट होण्याच्या मार्गावर, गेल्यावर्षीचा रिपोर्ट अजून गांभिर्याने घेतला नाही तर...

Pune Fraud Case : कोट्यवधींची फसवणूक करून मालमत्ता खरेदी; कोथरूडच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर जोडप्याच्या फसवणूकदारांना येरवडा जेल

Shirdi Highway:'शिर्डी महामार्ग होणार गुळगुळीत अन् ठणठणीत'; डांबराचा पहिला थर पडला, वर्षभरात पालटणार रूपडे !

Pune Weather Update : पुणेकरांनो, थंडी आणखी वाढणार! 'या' तारखेपासून पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता

Margshirsha Purnima 2025: 'या' 5 राशी माता लक्ष्मीला आहेत खूप प्रिय, मार्गशीर्ष पौर्णिमेपासून सुरु होईल गोल्डन टाइम

SCROLL FOR NEXT