मुंबई

धामणी धरणात पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन

CD

कासा, ता. ४ (बातमीदार) : सूर्या प्रकल्पातील धामणी धरणामधील मोठ्या जलसाठ्याचा विविध उपयोग केला जातो. शेती, पाणीपुरवठा, वीजनिर्मितीचा वापर केला जातो. आता पिंजरा पद्धतीने मत्स्यपालनालाही मोठी गती मिळाली आहे. या धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाहता सरकारने मत्स्यपालनासाठी परवानगी दिली असून, पाच वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राट दिले जातात.

धामणी व कवडास धरण मिळून सुमारे १६०० हेक्टर जलक्षेत्र असून, सरकारच्या जाहिरात आयुक्त कार्यालयामार्फत यासाठी दरवर्षी ठेके काढले जातात. विविध सहकारी सोसायट्या, तसेच खासगी व्यावसायिक ठेका भरू शकतात. ठेक्याची रक्कम अडीच लाखांपासून अकरा लाखांपर्यंत असते. ठेक्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात मत्स्यव्यवसाय विभाग व जलसंधारण विभाग यांना प्रत्येकी ५० टक्के महसूल मिळतो.

धरण परिसरात रोजगाराच्या संधी वाढण्यासाठी मत्स्यपालन महत्त्वाचे साधन ठरत आहे. २०१६ पासून जलाशयांमध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन योजना सुरू झाली असून, माशांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. योग्य जाळे, तरंगता पिंजरा, उच्च प्रतीचे मत्स्यबीज यांचा वापर या पद्धतीत आवश्यक मानला जातो.

स्थानिकांना रोजगाराची संधी
सध्या धामणी धरणात पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. धरणातील मत्स्यपालनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असून, यापुढील काळात या क्षेत्राला आणखी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धरणात प्रामुख्याने दोन प्रकारांनी मत्स्यपालन केले जाते.
- पिंजरा पद्धत : तरंगत्या पिंजऱ्यांमध्ये जाळे बसवून मासे पाळले जातात. प्लॅस्टिकचे ड्रम व पाईपच्या सांगाड्याने पिंजरा तयार केला जातो.
- नियंत्रण पद्धत : धरणातील पाण्याचे नैसर्गिक गुणधर्म व पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन मासे वाढवले जातात.

धामणी धरणातील चालू चक्र पूर्ण होत असून, पुढील महिन्यात नवीन ठेका जाहीर केला जाणार आहे.
- दिनेश पाटील, सहाय्यक आयुक्त
पालघर, ठाणे मत्स्य व्यवसाय विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT