मुंबई

पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहते पाणी वाया

CD

फोटो आहे
पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहते पाणी वाया;
नद्या-नाले कोरडे पडण्याची भीती
विक्रमगड, ता. ५ (बातमीदार) : यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडला, तरी काही भागातील नद्या आणि नाल्यांमधील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. पावसाळ्यापूर्वी उघडलेले बंधाऱ्यांचे दरवाजे अद्याप बंद करण्यात आले नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. दरवाजे तातडीने बसवले नाहीत, तर येत्या काळात शेतकरी आणि नागरिकांना पाणीटंचाईचा गंभीर सामना करावा लागू शकतो, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत.
विक्रमगड तालुक्यात देहर्जे व पिंजाळ अशा दोन प्रमुख नद्या असून, १० पेक्षा अधिक मोठे नाले आहेत. या नदी-नाल्यांवर लहान-मोठे बंधारे उभारण्यात आले आहेत. महापुराचा तडाखा बसू नये, म्हणून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडले जातात व पावसाचा अंदाज पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा बसवले जातात.
मात्र यावर्षी बंधाऱ्यांचे दरवाजे अद्यापही उघडेच ठेवले आहेत. दरम्यान, उन्हाचा पारा वाढत असून, नदी-नाल्यांतील पाणी झपाट्याने खाली जात आहे. अनेक नाल्यांमधील पाणी संपत आले असून, काही दिवसांत दरवाजे बसवले नाहीत, तर नाले कोरडे पडण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे रब्बी हंगामात नदी-नाल्यांच्या परिसरात भाजीपाला, फुलशेती, कलिंगड, टरबूज अशी पिके घेणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांवर पाण्याची गंभीर टंचाई ओढवू शकते.
जिल्हा परिषद व ग्रामपंचायत हद्दीतील अनेक बंधाऱ्यांचे दरवाजे अद्याप बंद झालेले नाहीत. आवश्यक पाणी साठवण्याची हीच वेळ असताना दुर्लक्ष झाल्यास पुढील काही महिन्यांत पाण्यासाठी ‘हाहाकार’ निर्माण होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

चौकट
बंधाऱ्यांची देखभाल दुरुस्तीची गरज
विक्रमगड तालुक्यात देहर्जे व पिंजाळ या नद्यांवर तसेच इतर नाल्यांवर ठिकठिकाणी महाराष्ट्र शासन लघु पाटबंधारे विभाग व जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाने कोल्हापूर टाइपचे तसेच इतर प्रकारचे अनेक सिमेंट बंधारे बांधलेले आहेत, मात्र या बंधाऱ्यांची वेळच्या वेळी देखभाल होत नसल्याने यातील निम्म्याहून अधिक बंधाऱ्यांना गळती लागलेली आहे.

प्रतिक्रिया :-
तालुक्यातील बंधाऱ्यांमध्ये अडविलेल्या पाण्यामुळे परिसरातील विहिरी, कूपनलिका यांच्यातील पाण्याची पातळी वाढत असते. पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येत नाही. त्यामुळे बंधाऱ्यांचे दरवाजे तातडीने बंद करण्याची गरज आहे.
-काशिनाथ भावर, शेतकरी, विक्रमगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Breaking News LIVE: मालवणी पोलिसांकडून नायजेरियन नागरिकाला ७२ लाखांच्या कोकेनसह अटक

Gold Price: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार, आश्चर्यकारक अहवाल समोर

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Pune News : कमला नेहरू रुग्णालयात २५ तज्ज्ञ डॉक्टरांची भरती; पगारात केली दुप्पटीने वाढ

Snake Bite : संर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचे वाचणार प्राण; ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट कीट’ ठरणार जीवरक्षक

SCROLL FOR NEXT