मुंबई

महिला बचत गटाचा उज्ज्वल यशातून मशरूम उत्पादन

CD

अळंबी उत्पादनातून स्वावलंबनाची नवी दिशा
तलासरीतील महिला बचत गटाचे उज्ज्वल यश
तलासरी, ता. ९ (बातमीदार) : तलासरी-डहाणूच्या हद्दीतील चिंचले भरभरे पाडा येथील रोशनी महिला बचत गटाने नैसर्गिक अळंबी (मशरूम) उत्पादनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या १२ महिलांच्या या गटाने केवळ घरगुती अर्थव्यवस्थाच मजबूत केली नाही, तर संपूर्ण तालुक्यासाठी उद्योजकतेची प्रेरणा दिली आहे.
बचत गट २० जानेवारी २०२० रोजी स्थापन झाला असून या गटाचे नेतृत्व अध्यक्ष सरिता संतोष भरभरे आणि सचिव मीना सचिन भावर करीत आहेत. गटातील महिलांनी कोसबाड येथे तीन दिवसांचे अळंबी उत्पादन प्रशिक्षण पूर्ण करून तांत्रिक कौशल्य आत्मसात केले. नवजीवन फाउंडेशनने गटाला कच्चा माल, साहित्य, तांत्रिक मार्गदर्शन आणि उत्पादनासाठी लागणाऱ्या शेडच्या उभारणीत मोलाची मदत केली. यामुळे महिलांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गुणवत्तापूर्ण अळंबी उत्पादन सुरू ठेवले.
या कर्तृत्वकथेमुळे चिंचले भरभरे पाडा गावाचा अभिमान वाढला आहे. ग्रामीण महिला एकत्र आल्यास त्या अर्थसाक्षरता आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात कसे यश मिळवू शकतात, याचा हा उत्कृष्ट संदेश आहे. रोशनी बचत गटाचा हा व्यवसाय इतर महिलांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरत असून, महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी नवा मानदंड निर्माण केला आहे.
------------------
स्थिर उत्पन्नाचा आधार
या महिलांनी उत्पादित केलेल्या नैसर्गिक अळंबीला मुंबईच्या बाजारात मोठी मागणी आहे. प्रत्येक उत्पादन बॅग ३०० ते ३५० रुपये दराने विकली जात आहे, ज्यामुळे सदस्य महिलांना स्थिर उत्पन्नाचा आधार मिळाला आहे. घरगुती उत्पन्न वाढल्यामुळे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्वावलंबनाची नवी वाट खुली झाली आहे.
------------------
महिलांनी बचत गट स्थापन करून, प्रशिक्षण घेऊन उद्योगात भरारी घ्यावी व त्यातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करावे, असे मी माझ्या ग्रामीण भागातील सर्व महिला बचत गटांना आवाहन करत आहे. आमच्या या उपक्रमातून १२ सदस्यांचे कुटुंब आर्थिक सक्षमतेच्या वाटेवर चालले असून यामधून आम्हाला एक नवी दिशा मिळाली आहे.
- सरिता भरभरे, रोशनी बचत गट अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft India Investment : 'मायक्रोसॉफ्ट' भारतात दीड लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार; सत्या नडेलांची मोठी घोषणा!

Dhananjay Munde: वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी 35 वकिलांची फौज; पैसा कोण पुरवतंय? कोर्टाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड- एकनाथ शिंदे

Mumbai News: रिक्षाचालक मुंबईच्या गतीचे हृदय! मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

Central Railway: नाताळ-नववर्षासाठी मध्य रेल्वेच्या ७६ विशेष गाड्या; पण कोणत्या मार्गावर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT