मुंबई

१०१ वाद्यांची काल जोपासणाऱ्या दृष्टीहीन योगिता तांबे ‘टॅग कलागंध’ पुरस्काराने सन्मानित

CD

दृष्टीहीन योगिता तांबे ‘टॅग कलागंध’ पुरस्काराने सन्मानित
ठाणे, ता. ८ (बातमीदार) : दृष्टीहीनतेवर मात करून १०१ वाद्ये वाजविणाऱ्या आणि लोकसंगीताची परंपरा पुढील पिढीपर्यंत नेणाऱ्या योगिता उमा अरुण तांबे यांना या ‘टॅग कलागंध’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाणे आर्ट गिल्डने वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. ७) डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर येथे हा पुरस्कार प्रदान केला. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव, टॅगचे अध्यक्ष महेश शानभाग, दिग्दर्शक विजू माने, सचिन जोशी, उदय सबनीस, रवी जाधव, संतोष पठारे, एमएसआरडीसीचे अनिल गायकवाड, अशोक नारकर यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.
ज्येष्ठ सिनेअभिनेते अजिंक्य देव यांनी देखील योगिता तांबे यांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, विशेष मुलांना त्यांच्यातील कमतरता न सांगता त्यांच्या विशेष क्षमतांकडे लक्ष वेधले पाहिजे. सामान्य माणसानेही आपल्यातील उणिवांपेक्षा देवाने दिलेल्या गुणांवर भर दिला. तर समाज अधिक सकारात्मक बनेल. आज मानसिक अपंगत्व सामान्यांमध्येही वाढले असून विचारांची दिशा चुकलेली आहे. विशेष मुलांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. योगिता तांबे यांच्या विचारांनी मला सकारात्मक ऊर्जा दिली आणि त्यांच्या सांगण्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे देव यांनी म्हटले. समाजात विशेष मुलांना समान स्थान मिळावे हे माझे स्वप्न असून त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

संघर्षमय प्रवास
योगिता तांबे यांना जन्मतः एका डोळ्याने काचबिंदूमुळे अंधत्व आले. त्यानंतर एका अपघातामुळे त्यांनी दुसरा डोळा ही गमावला. मात्र, दृष्टीहीन असूनही त्यांनी हार मानली नाही. पूर्ण अंधत्व आले तरी त्यांनी सकारात्मकतेने संघर्ष केला. शाळेत वाद्य नसताना कंपास, दगड अशा साध्या वस्तूंनी आवाज निर्माण करत त्यांनी संगीताची गोडी जोपासली आणि आज त्या १०१ वाद्ये वाजवतात.

५० वाद्यांच्या वादनाचा लिम्का बुक रेकॉर्ड
२०१९ मध्ये ५० वाद्यांच्या वादनाचा लिम्का बुक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. सध्या त्या बालवाडी ते आठवीतील मुलांना संगीत शिकवतात. मुलांना मार्क्सपेक्षा संस्कार आणि कलेची गोडी अधिक महत्त्वाची, असे मत योगिता तांबे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Adhav: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, उपेक्षितांच्या लढ्याचा नायक हरपला

Indigo Flight: ''खरं कारण काय ते आत्ता सांगता येणार नाही..'', इंडिगोने DGCA ला काय उत्तर दिलं?

Baba Adhav : कशी सुरू झाली होती कष्टाची भाकर? पंतप्रधानांनी घेतला होता आस्वाद, बाबा आढावांची हृदयस्पर्शी आठवण

IND vs SA, T20I: टीम इंडियाचे दोन तगडे शिलेदार तंदुरुस्त होऊन परतले; सूर्याच्या बातमीने द. आफ्रिकेचे धाबे दणाणले

Indian Army : ले. कर्नल हर्षवर्धन ढेकणे यांनी पुतीन यांना दिली मानवंदना; निमगाव म्हाळुंगीचा अभिमान!

SCROLL FOR NEXT