मुंबई

प्रमाणपत्राअभावी दिव्यांगावरील उपचाराला नकार

CD

भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : केवळ दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र नसल्याने एका पाचवर्षीय मुलावर स्पीच थेरपीचे उपचार करण्यास मिरा-भाईंदर महापालिकेच्या दिव्यांग उपचार केंद्राकडून नकार देण्यात आला आहे. या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

भाईंदर पूर्वेतील पाचवर्षीय मुलाला बोलता येत नाही. त्याच्या आई-वडिलांनी ठाण्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयात मुलाला दाखवले असता स्पीच थेरपीसह तीन प्रकारच्या थेरपी करण्याचा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिला. भाईंदरमध्ये भारतरत्न भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात दिव्यांग उपचार केंद्र आहे, परंतु रुग्णालयात स्पीच थेरपीवर उपचार करण्याची सुविधा नसल्याने डॉक्टरांनी त्यांना महापालिकेच्या आधार दिव्यांग पुनर्वसन केंद्रात जाण्याचा पालकांना सल्ला देत पत्रदेखील दिले.

या केंद्रात सुरुवातीला स्थानिक पुराव्यासाठी मुलाचे आधार कार्ड मागण्यात आले, परंतु मुलाचे आधार कार्ड काढलेले नसल्याने पालकांकडून ते मागण्यात आले. पालकांनी आपले आधार कार्ड केंद्रात सादर केले, मात्र त्यानंतर केंद्राकडून मुलगा दिव्यांग प्रमाणपत्र मागण्यात आले, परंतु हे प्रमाणपत्र काढलेले नाही, असे पालकांनी सांगितले. त्यानंतर केंद्राकडून केवळ दिव्यांग प्रमाणपत्र नसल्याने उपचार करण्यास नकार देण्यात आल्यामुळे पालकांना धक्काच बसला.

याप्रकरणी मिरा-भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते बैठकीत व्यग्र असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

नियमांवर बोट
ही बाब सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश गाडोदिया यांना समजल्यानंतर त्यांनी यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांकडे धाव घेतली, मात्र त्यांनीही नियमावर बोट ठेवले. दिव्यांग प्रमाणपत्र नसल्यास नियमानुसार उपचार करणे शक्य नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून गाडोदिया यांना देण्यात आले. याआधीदेखील महापालिकेच्या दिव्यांग उपचार केंद्राकडून याचप्रकारे दिव्यांगावर उपचार करण्यास नकार देण्यात आला असल्याची माहिती गाडोदिया यांनी दिली.


नियमांना हरताळ
एखाद्या अपघाताच्या घटनेतदेखील उपचार सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया पार न पाडता आधी अपघातग्रस्त व्यक्तींवर उपचार करण्याचे राज्य सरकारचे स्पष्ट आदेश आहेत. असे असताना केवळ प्रमाणपत्र नाही, म्हणून दिव्यांगांना उपचार नाकारणे हा निव्वळ अन्याय आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ओमप्रकाश गाडोदिया यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Adhav: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, उपेक्षितांच्या लढ्याचा नायक हरपला

Indigo Flight: ''खरं कारण काय ते आत्ता सांगता येणार नाही..'', इंडिगोने DGCA ला काय उत्तर दिलं?

Baba Adhav : कशी सुरू झाली होती कष्टाची भाकर? पंतप्रधानांनी घेतला होता आस्वाद, बाबा आढावांची हृदयस्पर्शी आठवण

IND vs SA, T20I: टीम इंडियाचे दोन तगडे शिलेदार तंदुरुस्त होऊन परतले; सूर्याच्या बातमीने द. आफ्रिकेचे धाबे दणाणले

Indian Army : ले. कर्नल हर्षवर्धन ढेकणे यांनी पुतीन यांना दिली मानवंदना; निमगाव म्हाळुंगीचा अभिमान!

SCROLL FOR NEXT