टोकावडे, ता. ८ (बातमीदार) : मुरबाड शहरासह संपूर्ण तालुक्यात दोन दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. पहाटे आणि सायंकाळच्या वेळेत गारठा वाढला असून, तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांनी ऊबदार कपड्यांचा वापर वाढवला आहे. बाजारपेठेत स्वेटर, टोपी, मफलर आदींच्या खरेदीतही वाढ दिसून येत आहे.
शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढत्या गारठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महिनाभरापूर्वी थंडीचा जोर वाढल्यानंतर ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली होती. ‘थंडी परत कधी येणार?’ अशी चर्चा सुरू असतानाच दोन दिवसांपासून तापमानाने पुन्हा घसरण सुरू केली आहे. बदलत्या हवामानाचा फटका शेतकरी वर्गालाही बसण्याची शक्यता आहे. भाजीपाला आणि आंबा पिकांवर थंडीचे दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी शेतकरी संरक्षणात्मक उपाययोजना करत आहेत. थंडीच्या वाढत्या लाटेमुळे तालुक्यात हिवाळ्याची चाहूल अधिक गडद होत आहे. येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खबरदारीचे आवाहन
आरोग्य विभागाने सर्दी, खोकला आणि तापापासून बचावासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी ऊबदार राहणे, थंड पदार्थ व पेये टाळणे याबाबत खबरदारी घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.