मुंबई

तक्रारदार महिलेवर पोलिसाकडून अत्याचार

CD

तक्रारदार महिलेवर
पोलिसाचा अत्याचार
कासा, ता. ८ (बातमीदार) ः कौटुंबिक तक्रारी अर्जाची चौकशी करण्यासाठी कासा पोलिस ठाण्यात आलेल्या एका महिलेवर पोलिस हवालदारानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना डहाणू तालुक्यात कासा येथे उघडकीस आली. याप्रकरणी हवालदार शरद भोगाडे (वय ४१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
२९ नोव्हेंबर रोजी तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी पीडित महिला कासा पोलिस ठाण्यात गेली होती. या वेळी हवालदाराने पोलिस ठाण्यामागील एका खोलीत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, हवालदाराविरोधात लैंगिक अत्याचारासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर रविवारी रात्री त्यास अटक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. दरम्यान, कासा पोलिस ठाण्याचे प्रभारी अविनाश मांदळे यांचीही तत्काळ जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. याप्रकरणी कासा पोलिस पुढील तपास सुरू असून, आरोपी हवालदारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Adhav: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, उपेक्षितांच्या लढ्याचा नायक हरपला

Baba Adhav and Politics : प्रचंड लोकप्रियता असूनही बाबा आढाव राजकारणापासून का राहिले दूर?

Baba Adhav : कशी सुरू झाली होती कष्टाची भाकर? पंतप्रधानांनी घेतला होता आस्वाद, बाबा आढावांची हृदयस्पर्शी आठवण

Indigo Flight: ''खरं कारण काय ते आत्ता सांगता येणार नाही..'', इंडिगोने DGCA ला काय उत्तर दिलं?

IND vs SA, T20I: टीम इंडियाचे दोन तगडे शिलेदार तंदुरुस्त होऊन परतले; सूर्याच्या बातमीने द. आफ्रिकेचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT