मुंबई

रशियासोबतच्या संबंधाची पायाभरणी काँग्रेस काळात!

CD

रशियासोबतच्या संबंधाची
पायाभरणी काँग्रेस काळात!
काँग्रेस प्रवक्ते तिवारी यांचा दावा
मुंबई, ता. ८ : १९७१च्या युद्धात अमेरिकेने पाकिस्तानला पाठिंबा दिला त्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूरशास्त्री, इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील भारताची प्रगती, स्वयंसिद्धता आणि परराष्ट्रनीतीची दखल घेऊन रशियाने भारतास मदत केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मुत्सद्देगिरीमुळे ऑगस्ट १९७१मध्ये भारत-सोव्हिएत करार झाला. चिनी धमक्यांना न घाबरता रशियाने भारतास पाठिंबा देत मैत्रीचे संबंध जोपासले. त्याबाबतची पायाभरणी काँग्रेसच्याच काळात झाली, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सांगितले.
गेल्या ६५ वर्षांत केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना परदेशी नेत्यांच्या राष्ट्रपतींद्वारा आयोजित स्वागत कार्यक्रमाला लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांना नेहमीच बोलावले जात होते. अशा कार्यक्रमांना तत्कालीन विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी, अरुण जेटली, सुषमा स्वराज आदी नेते उपस्थित राहिले होते; मात्र भाजप सरकारच्या काँग्रेसबाबत असलेल्या अहंकारी वृत्तीने या प्रथा पायदळी तुडवल्या जात आहेत. ही बाब लोकशाही परंपरांचे हनन करणारी असल्याची टीकाही तिवारी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Adhav: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, उपेक्षितांच्या लढ्याचा नायक हरपला

Baba Adhav and Politics : प्रचंड लोकप्रियता असूनही बाबा आढाव राजकारणापासून का राहिले दूर?

Indigo Flight: ''खरं कारण काय ते आत्ता सांगता येणार नाही..'', इंडिगोने DGCA ला काय उत्तर दिलं?

Baba Adhav : कशी सुरू झाली होती कष्टाची भाकर? पंतप्रधानांनी घेतला होता आस्वाद, बाबा आढावांची हृदयस्पर्शी आठवण

IND vs SA, T20I: टीम इंडियाचे दोन तगडे शिलेदार तंदुरुस्त होऊन परतले; सूर्याच्या बातमीने द. आफ्रिकेचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT