मुंबई

जव्हारवासीयांना २१ डिसेंबरची प्रतीक्षा; आकडेमोड जोर धरून

CD

जव्हारवासीयांना २१ डिसेंबरची प्रतीक्षा
निवडणुकीच्या निकालाबाबत आकडेमोड शिगेला
जव्हार, ता. ९ (बातमीदार) : राज्यातील सर्वाधिक ९० टक्के मतदान झालेल्या जव्हार नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणीची तारीख पुढे ढकलल्याने जव्हारवासीय सध्या २१ डिसेंबरची आतुरतेने वाट पाहात आहेत. २ डिसेंबरला मतदान पार पडून आठवडा उलटला तरी, निवडणुकीचे राजकीय तापमान अजूनही ओसरलेले नाही. निकाल नेमका काय असेल, याबद्दल शहरात आकडेमोड आणि तर्क-वितर्कांना जोर आला आहे.
सुरुवातीला ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. शहरातील चौक, राजकीय मंडळींच्या मैफिली आणि समाजमाध्यमांवर केवळ निवडणुकीच्या निकालाचीच चर्चा आहे. कोणाचे गणित जुळते आणि कोणाचा अंदाज चुकतो, हे २१ डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
दरम्‍यान, मतदान संपले असले तरी उमेदवार आणि कार्यकर्ते अजूनही रिलॅक्स झालेले नाहीत. शहरात सर्वत्र ‘कोणाला किती मते मिळतील?’, ‘कोणत्या प्रभागात कोणाचे पारडे जड आहे?’ आणि ‘अनपेक्षित निकाल लागेल का?’ अशा चर्चांना उधाण आले आहे.
----------------------
राजकीय वातावरण तापलेलेच
जव्हार शहरातील १० प्रभागांमध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तीव्र चुरस दिसून आली होती. मतदान शांततेत पार पडले असले तरी मतदारांनी नेमका कोणाला अंतिम पाठिंबा दिला, याचा अंदाज लावणे राजकीय विश्लेषकांना कठीण झाले आहे. यामुळे निकालापूर्वीचे वातावरण निवडणूक प्रचाराएवढेच तापलेले जाणवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात थंडीची लाट कायम, 'या' १५ जिल्ह्यांना येलो अलर्ट; जाणून घ्या तुमच्या भागांत कसे असेल हवामान?

Shah Rukh Khan: धुरंधर लाटेतही शाहरुखची एन्ट्री व्हायरल; ‘पठाण २’चं शूट लवकरच!

Pune Airport : पुणे विमानतळावरील ‘प्रवास’ आता सुसह्य; प्रवासी आनंदले; गोंगाट अन् गर्दीही नाही

Court Action Deputy Collector : नुकसानभरपाई दिली नाही कोर्टाने थेट उपजिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची, संगणक केले जप्त; कारवाईने धावाधाव अन्...

Solapur Politics: 'साेलापुरातील दाेन्ही देशमुख आमदारांची एकी'; मुख्यमंत्री फडणवीसांसमोर मांडले प्रश्‍न, निधी देण्याची ग्वाही..

SCROLL FOR NEXT