मुंबई

नोकरीच्या प्रलोभनातून तरुणाला लुबाडले

CD

नोकरीच्या प्रलोभनातून तरुणाला लुबाडले
नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर): ऑनलाइन पार्ट टाइम जॉब देण्याचे प्रलोभन दाखवून उलवेत राहणाऱ्या ३९ वर्षीय युवकाला ३४ लाख ३९ हजार ७७७ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात उरण पोलिसांनी फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
उलवे येथे राहणारा जगनकुमार याची सप्टेंबरमध्ये सायबर टोळीतील सुचित्रा नामक महिलेशी व्हॉट्सॲपवरून संपर्क झाला होता. महिलेने जगनकुमारशी संवाद साधत त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पार्ट टाइम जॉबची ऑफर देताना प्रतिदिन २० किंवा ४० टास्क पूर्ण केल्यास मोठा नफा मिळेल, असे प्रलोभन दिले. तीन महिन्यांच्या कालावधीत जवळपास ३४ लाख ४० हजार भरण्यात आले, पण पैसे परत देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे उलवे पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. या प्रकरणात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Year Ender 2025 : 2025 मध्ये पैशांशी संबंधित हे 10 मोठे नियम लागू; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; काय बदललं तुमच्यासाठी?

Anna Hazare Hunger Strike : सशक्त लोकायुक्त कायदा अमलात आणण्यासाठी अण्णा हजारे पुन्हा रणांगणात; ३० जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा!

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी आघाडी किंवा स्वबळावर कॉंग्रेस सज्ज; उमेदवारांची निवड सुरू!

Kolhapur Gunthewari Proposals : महापालिकेच्या दरवाजाशी पुन्हा नागरिकांची गर्दी; गुंठेवारीसाठी प्रस्ताव दाखल करताना कागदपत्रांचा खेळखंडोबा

Latest Marathi News Live Update : नगरमध्ये दोघा पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला

SCROLL FOR NEXT