श्वानांच्या तक्रारीसाठी पालिकेची हेल्पलाइन
भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : भटक्या श्वानांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत तातडीने पावले उचलण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार मिरा-भाईंदर महापालिकेने तक्रारी नोंदवण्यासाठी ०२२-२८१९२८२८ (एक्स्टेंशन-१३८) हा हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या कार्यक्षेत्रातील भटक्या श्वानांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक सुरू करणे, तक्रारींचे त्वरित निराकरण करणे, अशा उपाययोजनांचा समावेश आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर सकाळी १० ते सायकांळी ५ वाजेपर्यंत संपर्क साधता येणार आहे.