फोटो ओळ
छत्रपती शिवाजी महाराज (शीतल) तलाव, कुर्ला परिसरात आढळलेली अडीच फूट लांबीची मगर वनविभागाच्या पथकाने तब्बल २५ दिवसांच्या सलग प्रयत्नांनंतर सुरक्षितरीत्या पकडली. या मगरीला ठाणे वनविभाग कार्यालयात ठेवण्यात आले आहे. कुर्ला परिमंडळ वन अधिकारी जनार्दन बोडेकर, वनरक्षक विक्रम पवार, ज्योती भोसले यांच्यासह सर्फ इंडिया संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)