मुंबई

धारावीत साफसफाई

CD

धारावीत साफसफाई

मुंबई, ता. १३ (बातमीदार) : शाहूनगर, माटुंगा लेबर कॅम्प, धारावी परिसराची मुंबई पालिकेने शनिवारी साफसफाई केली. त्यामुळे हा परिसर कचरामुक्त झाला होता.
मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) दिघावकर यांच्या सूचनेनुसार जी/उत्तर विभागात स्वच्छतेसाठी प्रभावी पावले उचलण्यात आली. नुकतेच पदभार स्वीकारलेले सहाय्यक अभियंता किरणसिंग पाटील यांनी पर्यवेक्षक, इतर सहकाऱ्यांसोबत धारावी परिसरातील कचऱ्याच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली. या वेळी विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर शाहूनगर, माटुंगा लेबर कॅम्प, धारावी येथील उघड्यावर पडलेल्या कचऱ्याचे नियोजन करत तातडीने साफसफाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीने येत्या काही दिवसांतही धारावीतील विविध ठिकाणी उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशाच प्रकारची मोहीम राबविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"घरचेच काम देत नाहीत बाहेरचे काय देणार ?" प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सख्खा भाऊ करतोय ड्रायव्हरचं काम; मुलगा गंभीर आजारी

Latest Marathi News Live Update : बार्शीतील महाआघाडीच्या प्रचारासाठी उद्या एकनाथ शिंदेंची जाहीर सभा

ना ओरडली, ना मारलं... जेहला धाक दाखवण्यासाठी करिना कपूरने जे केलं ते पाहून नेटकरी म्हणतात, 'ही तर आमच्या आईसारखीच...'

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

SCROLL FOR NEXT