मुंबई

विद्यार्थीनींना पोलिसांनी दिला मोलाचा संदेश "से नो टू बॅड टच"

CD

विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे धडे
माटुंग्यातील एसएनडीटी महाविद्यालयात पोलिसांकडून मार्गदर्शन

धारावी, ता. १४ (बातमीदार) : वूमेन्स इंटर्नल ग्रीवन्सस अँड रेड्रेसेल कमिटी आणि माटुंगा पोलिस ठाण्याच्या सहकार्याने माटुंगा येथील एस.एन.डी.टी. महाविद्यालयाच्या श्री एम.पी. शहा आर्टस् अँड कॉमर्स महिला कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींना महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय मंडळ, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना पत्की, उपप्राचार्या अल्पा दोषी व पर्यवेक्षक वर्षा पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षितता कमिटीचे सदस्य दीपक भालेराव, गौरी राऊळ, ग्रीष्मा झाला आणि प्रो. शरद गिरमकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
महाविद्यालयातील विद्यार्थिनींना महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करताना त्यांच्या समस्यांचे निवारण करणे आणि त्यांना पोलिस व शासनाकडून उपलब्ध असलेल्या मदत प्रणालींची व हेल्पलाईन क्रमांकांची माहिती देणे हा उद्देश या कार्यक्रमाचा होता.
माटुंगा पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस सब इन्स्पेक्टर निकिता नरणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश काळे, पोलिस हवालदार राऊत आणि पोलिस शिपाई जाधव यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला.
याप्रसंगी महिला उप निरीक्षक निकिता नरणे यांनी निर्भया पथक आणि सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. मुलींनी आपत्कालीन परिस्थितीत निर्भया पथकाशी कसा संपर्क साधावा, त्यांना त्वरित कशी मदत होऊ शकते, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Alphonso mango : रत्नागिरी हापूस आता एआय तंत्रज्ञानावर; मोबाईल ॲपवरून बागेचे व्यवस्थापन होणार, हापूस शेतीत डिजिटल क्रांती

'चला हवा येऊ द्या' मध्येपण तेच काम करायचं होतं तर पुन्हा हास्यजत्रेत का नाही गेलास? गौरव मोरे म्हणतो- अरे तुम्ही लोक...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक सुरू

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

Bhagat Singh Koshyari : "राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत"; भगतसिंह कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

SCROLL FOR NEXT