झरी ग्रामपंचायतीत समृद्ध पंचायतराजअंतर्गत
विविध विकास उपक्रमांना गती
तलासरी, ता. १५ (बातमीदार) : तलासरी तालुक्यातील झरी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध विकासकामांना गती देत आदर्श उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. नुकतेच ग्रामस्थांच्या श्रमदानातून पाणंद रस्ता आणि वनराई बंधारा तयार करण्यात आला असून, गावाच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळाले आहे.
सरपंच मीना ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. १ एप्रिल २०२५ पूर्वीची मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकी वसूल करण्यासाठी ग्रामपंचायतीने थकबाकीदारांना एकरकमी रक्कम भरल्यास ५० टक्के सवलत जाहीर केली आहे.
झरी ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत एकल महिला सन्मान, आरोग्य शिबिर, सुरक्षेच्या दृष्टीने जि. प. शाळा तसेच झरी मेन रोड नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि आयुष्मान भारत योजना यांसारखे सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
या सर्व उपक्रमांमुळे गावामध्ये विकासाची नवी ऊर्जा निर्माण झाली असून, सर्वांगीण प्रगतीस चालना मिळेल, असा विश्वास सरपंच मीना ठाकरे, उपसरपंच अरविंद भावर आणि ग्रामपंचायत अधिकारी श्रुती पाटील यांनी व्यक्त केला आहे.
------------------
पर्यावरण आणि सुविधा
पर्यावरणाचे भान राखत झरी ग्रामपंचायतीने प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असून, दंड आकारणी केली जात आहे. तसेच, प्रत्येक कुटुंबाला कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. जि. प. शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट बसवण्यात आले असून, ग्रामस्थांसाठी खुली व्यायामशाळादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.