मुंबई

उद्यानात प्रकाश देणारे विद्युत दिवे लावा

CD

चारकोपमधील नागदेवता उद्यान अंधारात
दिव्यांची संख्या वाढवण्याची ज्येष्ठ नागरिकांची मागणी

कांदिवली, ता. १५ (बातमीदार) : चारकोप सेक्टर ३ येथील नागदेवता ओंकारेश्वर मनोरंजन उद्यानात असलेले विजेचे दिवे अंधुक प्रकाश देत असल्याने रात्रीच्या वेळी महिला व ज्येष्ठ नागरिकांना चालणे किंवा योगा करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे उद्यानात जास्त प्रकाश देणारे दिवे लावावेत किंवा दिव्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
कांदिवली आणि बोरिवली पश्चिमेकडे म्हाडाची मोठी वसाहत आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये म्हाडा व्यवस्थापनाने मैदान आणि उद्यान उपलब्ध करून दिले आहेत. सेक्टर ३ येथील नागदेवता ओंकारेश्वर मनोरंजन उद्यानाचा माजी नगरसेविका संध्या विपुल दोशी यांनी कायापालट केला. संगीतातील वाद्याच्या जसे हार्मोनियम, तबला, बासरी, वीणा आदींच्या हुबेहूब प्रतिकृती या उद्यानात साकारल्या आहेत. जॉगिंग ट्रॅक आणि विविध शोभेच्या झाडांमुळे हे उद्यान नागरिकांच्या पसंतीचे ठरत आहे. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या मनोरंजन उद्यानात योगा करणे, चालणे यासाठी येतात. उद्यानात ज्येष्ठ नागरिक कट्टासुद्धा आहे. आठवडाभरापासून उद्यानातील मध्यभागी परिसरातील आणि जॉगिंग ट्रॅकवरील दिवे कमी प्रकाश देत असल्याने येथे अंधार पसरला आहे. त्यामुळे चालणे, योगा करणे असे व्यायाम करताना नागरिकांना अडचणीचे ठरत आहे.
पालिकेच्या उद्यान विभागाने या उद्यानात जास्त प्रकाश देणारे तीन दिवे लावले आहेत, मात्र उद्यानाचा परिसर मोठा असल्याने विद्युत दिव्यांची कमतरता जाणवते.


नागदेवता ओंकारेश्वर मनोरंजन उद्यान हे परिसरातील नागरिकांसाठी देणगी आहे. मोठा परिसर, विविध झाडे आणि मोठा जॉगिंग ट्रॅक यामुळे सामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक येथे मोठ्या प्रमाणात येतात, मात्र दिव्यांची कमतरता असल्याने रात्रीच्या सुमारास उद्यानात येणे ज्येष्ठांसाठी अडचणीचे ठरत आहे.
- विक्रम वंडेकर, ज्येष्ठ नागरिक, चारकोप


उद्यानात जास्त प्रकाश देणारे तीन दिवे लावले आहेत. काळोख, अंधुक प्रकाश असेल, तर लवकरच संबंधितांना माहिती देऊन उद्यान प्रकाशमान करण्यात येईल.
- जनार्दन माने, उद्यान सहाय्यक अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाचा ऑनलाईन आढावा

SCROLL FOR NEXT