मुंबई

जेसीबीच्या बहाण्याने १४ लाख उकळले

CD

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : नागपूर येथे राहणाऱ्या एका दलालाने फायनान्स कंपनीच्या माध्यमातून जेसीबी मशीन घेऊन देण्याच्या बहाण्याने वाशीत राहणाऱ्या एका व्यावसायिकाकडून १४ लाख १९ हजार रुपये उकळल्याचे, तसेच त्याला बनावट बँक पावती पाठवून त्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आली आहे. भूषण रवींद्र पांडे असे संशयिताचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार संजयकुमार कलाल (वय ४६) हे वाशी सेक्टर १६ मध्ये राहण्यास असून त्यांचा जुनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. भूषण पांडे हा नागपूरमध्ये राहण्यास असून तो मध्यस्त म्हणून काम करतो. त्याने जूनमध्ये संजयकुमार यांना खासगी कंपनीकडून जेसीबी मशीन घेऊन देण्याचे प्रलोभन दाखवले होते. त्यानुसार या दोघांमध्ये २० लाख ७० हजारांचा व्यवहार ठरवला होता. त्यावेळी भूषणने कंपनीकडे १७ लाख ७० हजार रुपये भरल्याचे दर्शवणाऱ्या बनावट बँक पावती संजयकुमार यांना पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.

या बनावट कागदपत्रांवर विश्वास ठेवून संजयकुमार यांनी भूषणला १४ लाख ५० हजार रुपये ऑनलाइन पाठवून दिले; मात्र पैसे मिळाल्यानंतरदेखील पांडे याने संजयकुमार यांना मशीन दिली नाही. त्यांनी रक्कम परत मागितली असता फक्त ४० हजार परत करून उर्वरित १४ लाख १० हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली.

पुन्हा बनावट पावती
विशेष म्हणजे, पांडे याने पैसे परत करत असल्याचे भासवण्यासाठी संजयकुमार यांना पुन्हा १३ लाख ८० हजारांच्या बनावट बँक पावत्या पाठवून त्यांची दिशाभूल केली. याप्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वनविभागाची जमीन हडपली, त्यातून हायवे जाताच भरमसाठ मोबदला मिळवला; भाजप नेत्याला ईडीचा दणका, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

Pune News: पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे बिनविरोध; उपमहापौरपदी परशुराम वाडेकर; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची माघार!

'ही माझी जर्सी आहे, तुला...', सचिन तेंडुलकरने U19 वर्ल्ड कप विजेत्या Ayush Mhatre ला काय सांगितलं? पाहा Video

Solapur ZP Result : 3 आमदार, 8 माजी आमदार; भाजपची कामगिरी दमदार, 64 वर्षांनंतर झेडपीत फुलले कमळ, बार्शी, मंगळवेढा, उ. सोलापुरात विरोधकांना व्हाईटवॉश

Chandrapur Deputy Mayor : ईश्वर चिठ्ठीने ठरला चंद्रपूरचा उपमहापौर, भाजप-शिवसेना युतीचे प्रशांत दानव विजयी, काँग्रेस-एमआयएमची खेळी फसली

SCROLL FOR NEXT