मुंबई

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

CD

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
स्थगित पाच प्रभागांसाठी २० डिसेंबरला मतदान
बदलापूर, ता. १५ (बातमीदार)ः कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत २ डिसेंबरला बहुतांश प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती; मात्र काही कारणांमुळे उर्वरित राहिलेल्या पाच प्रभागांतील जागांसाठी आता २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. प्रभाग क्रमांक ५: ५-ब, प्रभाग क्रमांक ८: ८-अ, प्रभाग क्रमांक १०: १०-ब, प्रभाग क्रमांक १५: १५-ब, प्रभाग क्रमांक १७: १७-अ या संबंधित प्रभागांमध्ये सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

एकूण ५६ केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदानासाठी ७० ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या दिवशी प्रत्यक्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात उद्या (ता. १६) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मतदारांसाठी विशेष सूचना
पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी मतदारांसाठी शाई लावण्याबाबत विशेष माहिती दिली आहे. २ डिसेंबरच्या मतदानात मतदारांना डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यात आली होती; मात्र २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानात या उर्वरित पाच प्रभागांतील मतदारांना डाव्या हाताच्या तर्जनीच्या शेजारील मधल्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे.

प्रशासनाचे आवाहन
निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, सहाय्यक निवडणूक अधिकारी मारुती गायकवाड आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत देशमुख यांनी नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असून, नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. २ डिसेंबरच्या मतदानाच्या टक्केवारीवर आधारित, २० तारखेचे मतदान देखील होईल, असा आशावाद पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Latest Marathi News Live Update: स्थायी समिती कोणाकडे? आज होणार यादी जाहीर

Ambegaon News : शिरदाळे येथील गावच्या तळ्यात मासे पकडताना साहेबराव केदारी यांचा पाण्यात बुडून मृत्यू

Horoscope : उद्याचा दिवस 'या' ४ राशीच्या लोकांसाठी लकी; अचानक मिळतील पैसे, प्रेम आणि नातेसंबंधात मोठा बदल, नोकरी-व्यवसायात यश

SCROLL FOR NEXT