मुंबई

घणसोलीतील समाजसेविकेला २० लाखांचा गंडा

CD

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : सायबर चोरट्यांनी एका वैद्यकीय समाजसेविकेला टेलिग्रामद्वारे हंगामी नोकरीचे प्रलोभन दाखवून तिच्याकडून तब्बल १९ लाख ९४ हजार रुपये उकळून तिची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेरूळ पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

४५ वर्षीय महिला घणसोली येथे राहण्यास असून, ती नेरूळ येथील एका रुग्णालयामध्ये वैद्यकीय समाजसेविका म्हणून कार्यरत आहे. १७ ऑक्टोबरला सायबर चोरट्यांनी महिलेचा टेलिग्राम ॲपवरील हदीजा नावाच्या ग्रुपमध्ये समावेश केला. पार्टटाइम जॉबद्वारे घरबसल्या पैसे मिळतील, अशा प्रकारचे मेसेज पाठवण्यात आले होते. ग्रुपमधील सूचनेनुसार महिलेने कृतिका मेहरा नावाच्या महिलेला संपर्क साधला असता, तिने यूट्युबवरील व्हिडिओ लाइक केल्यास प्रत्येक लाइकसाठी ५० रुपये मिळतील, असे सांगितले. त्यानुसार या महिलेने व्हिडिओ लाईक केल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम तिच्या खात्यात जमा झाली. त्यामुळे तिचा यावर विश्वास बसला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी टास्कच्या नावाखाली दोन हजार रुपये गुंतवणूक केल्यास तीन हजार रुपये परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवले. त्यातही सुरुवातीला थोडाफार परतावा देऊन पुढील टास्कसाठी रक्कम वाढवण्यास भाग पाडले. अखेर सायबर टोळीने क्रिफ्टो करन्सीच्या नावाखाली अधिक नफा मिळेल, असे सांगत या महिलेकडून एकूण १९ लाख ९४ लाख रुपये उकळले. यानंतर महिलेने पैसे परत मागितले असता, सायबर चोरट्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईतील ट्रेनमधील शौचालयाची दुर्गंधी दूर होणार! रेल्वेचा क्रांतिकारी निर्णय; नवीन योजना काय?

Manisha Mhaiskar : मोठी बातमी! कडक शिस्तीच्या मनीषा म्हैसकर गृह विभागाच्या नव्या अपर मुख्य सचिव, तर मिलींद म्हैसकर यांच्याकडे बांधकाम विभाग

IND vs NZ 5th T20I: इशान किशन खेळणार, संजू सॅमसनचा पत्ता कट होणार? टीम इंडियाच्या बॅटींग कोचने दिले महत्त्वाचे अपडेट्स

EXCLUSIVE: प्रभूचा कंटेन्ट अश्लील असूनही त्याला 'बिग बॉस मराठी ६'मध्ये का घेतलं? क्रिएटिव्ह हेडने दिलेलं उत्तर एकदा वाचाच

Budget Expectations 2026: यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी कौशल्य आणि पायाभूत सुविधांकडे लक्ष

SCROLL FOR NEXT