मुंबई

हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना अटक

CD

हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना अटक
डोंबिवली, ता. १५ ः डोंबिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (ता. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास कोपर रेल्वे स्थानकाच्या जवळील परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून नरेंद्र ऊर्फ काल्या भालचंद्र जाधव (वय ३७) याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी खुनाचा त्वरित उलगडा करीत तिघांना अटक केली आहे. मुख्य आरोपी आकाश गौरी शंकर बिराजदार (२९) यासह दिवाकर महेशचंद्र गुप्ता (१८), आलिफ शहादाब खान (१८) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी शिवीगाळ व धमक्या देत चाकू, कोयता व लोखंडी रॉडने डोके, मान, छाती व शरीरावर सुमारे ४० वार करून नरेंद्र यांना ठार मारले. हल्ला थांबवण्याचा प्रयत्न करणारे फिर्यादी शुभम राजेश पांडे (२७) यांच्यावरही चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपास पथक तयार केले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दिवा येथून आकाश याला अटक केली. तसेच त्याच्या दोघा साथीदारांनादेखील अटक केली. मुख्य आरोपी आकाश बिराजदार याने पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या गुन्ह्याचा अधिक तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

Latest Marathi News Live Update : श्वान चिकित्सकांच्या अधिवेशनाला मोहन भागवत उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार

Hug Day in Valentine Week : सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...; नात्यांना सावरण्यासाठी कधीकधी स्पर्शाची उब हवी असते!

SCROLL FOR NEXT