राष्ट्र रक्षणासाठी तरुणांनी बजरंग दलात सहभागी व्हावे
विश्व हिंदू परिषदचे कोंकण प्रांत मंत्री मोहन सालेकर यांचे प्रतिपादन
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) ः देश, धर्म रक्षणासाठी अधिकाधिक तरुणांनी बजरंग दलात सहभागी व्हावे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे कोंकण प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी ऐरोली येथे केले. गीता जयंतीनिमित्त बजरंग दलाच्या वतीने शौर्य संचलन कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
मोहन सालेकर म्हणाले की, देशातील वाढता आतंकवाद हा अंतर्गत सुरक्षेचा मोठा मुद्दा आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख भागांचे डेमोग्राफी बदलण्याचे मनसुबे आखले जात आहेत. याला सामोरे जाण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी बजरंग दलात सहभागी व्हावे. देश, धर्म रक्षणाच्या प्रकियेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
गीता जयंतीनिमित्ताने शौर्य संचलनात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन केले. यावर्षी ठाणे विभागाचे एकत्रित शौर्य संचलन रविवारी (ता. १४) ऐरोली येथे करण्यात आले. या शौर्य संचलनात एकूण ७९१ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
स्वामी शिवरूपानंद म्हणाले की, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल समाजात वेळोवेळी धर्मरक्षणासाठी जनजागृतीचे कार्य करत आहे. बजरंग दलाने हाती घेतलेले व्यसनमुक्त युवा, सशक्त भारत हे अभियानदेखील प्रशंसनीय आहे. व्यसनमुक्ती अभियानामुळे लाखो तरुणांच्या जीवनाला आकार मिळणार आहे. बजरंग दल कोंकण प्रांत संयोजक रणजित जाधव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना स्वदेशी वस्तू वापराबाबतची प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रमात कबीर मठ ठाणे महंत महावीर दास, हभप महादेव शहाबाजकर, हभप लक्ष्मण पांचाळ, हभप सुनील रानकर, हभप पंडित वर्पे, विश्व हिंदू परिषद ठाणे विभाग मंत्री मनोज शर्मा, सहमंत्री आशुतोष तिवारी, विश्व हिंदू परिषद नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक भन्साली, उपाध्यक्ष डॉ. अतुल नाईक, जिल्हा सहमंत्री श्याम मोहनन, तेजस पाटील, संदीप पाल, योगेश सिलवेरू, संजीव रावत उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.