हातमाग कारागिरीचे प्रदर्शन
मुंबई : कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये १८ व १९ डिसेंबरला टाटा ट्रस्टचा उपक्रम ‘अंतरन’ या कारागिरी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कला आणि हस्तकलांचा संपन्न वारसा पाहायला मिळणार आहे.
टाटा ट्रस्टच्या कला-आधारित उदरनिर्वाह उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग अंतरनद्वारे सादर केल्या जाणाऱ्या दोनदिवसीय प्रदर्शनामध्ये आसाम, नागालँड, ओडिशा व आंध्र प्रदेशमधील सर्वोत्तम हातमाग कपडे पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनामध्ये साड्या, दुपट्टे, स्टोल्स, फॅब्रिक्स अशा बाबींचा समावेश आहे. ते देशातील वैविध्यपूर्ण कला, परंपरेला प्रशंसित करण्यासाठी आणि कारागीर, डिझाइनर्स, ग्राहक व उत्साहींना एकत्र करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. यंदाची प्रदर्शनाची थीम ‘थ्रेड्स ऑफ टूमारो’ आहे.
सात छुप्या हस्तकला विभागांमधील कपड्यांची परंपरा सर्वांचे लक्ष वेधून घेतील. त्यात कॉटन व सिल्कमधील विविध तंत्रांचा अनुभव मिळेल. आसामच्या कामरूप व नलबारी विभागांमधील रस्टिक कॉटन, एरि सिल्क, आकर्षक मलबरी सिल्क्स, नागालँडचे आकर्षक बॅक-स्ट्रॅप विणकाम, ओडिशामधील टसर सिल्क व इकत, वेंकगिरीमधील कॉटन, वैविध्यपूर्ण सिल्क्स आणि आंध्र प्रदेशमधील हँड प्रिंटेड कलमकारी कपडे येथे पाहायला मिळणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.