मुंबई

खळ्यात पीक मळणीला वेग

CD

पीक मळणीला वेग
जव्हारमधील आदिवासी भागात शेतीची कामे सुरू

जव्हार, ता. १६ (बातमीदार) : यंदा, पावसाळा अधिक काळ लांबल्याने कोकणातील शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे, मात्र जे शेतात पिकले ते पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे. जव्हार तालुक्यातील आदिवासी भागात पिकाच्या मळणीला वेग आला आहे.
शेणाने सारवलेले स्वच्छ खळे करून त्यावर भात, नागली, वरई, उडीद, कुळीद, तूर आदी पिकांची मळणी पारंपरिक पद्धतीने केली जात आहे. तसेच भाताच्या कठीण गवताची मळणी झाल्यावर पेंढा व्यवस्थित रचून उडवी सजू लागली आहेत.
जव्हार, न्याहाळे तसेच तालुक्यातील बहुतांश भागात भात हेच मुख्य पीक आहे. या पिकाची काढणी दिवाळीपासून सुरू होते. भाताच्या पेंढ्यात जनावरांना हानिकारक अशी खाज आणणारी कूस, तसेच इतर घटक असतात, मात्र खळ्यावर बैलांच्या पायाखाली मळणी केल्यास हे सर्व घटक निघून जातात. तसेच कडक असणारे गवतही खाण्यास मऊ होते. त्यामुळे या भागात थंडीला सुरुवात झाली, की मळणीला प्रारंभ केला जातो.

पारंपरिक शेतीला पसंती

भाताबरोबरच डोंगराळ भागात नागली, वरई यांचीही मळणी केली जाते. हल्ली भातशेतीत भात झोडण्याऐवजी थेट मळणी यंत्रात टाकून भाताचे धान्य काढले जाते. त्यामुळे गवताचा कठीण भाग मशीनमधून बाहेर पडत असल्याने मळणी करण्याची गरज लागत नाही, मात्र दुर्गम भागात यंत्राचा वापर फारसा होत नसल्याने बऱ्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: न्यूझीलंडच्या सलमीवीरांनी वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकला सामना; स्पर्धेत्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Video Viral: दुचाकीस्वारासह उचलली गाडी; पुण्यातला टोइंग व्हॅनचा व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून युतीत तानातानी?

मनवा नाईक पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत; 'या' प्रसिद्ध निर्मात्यासोबत मिळून करणार धमाका

Ajit Pawar Plane crash: रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांच्या नावाचा उल्लेख का केला? 'त्या' दोन कंपन्यांपैकी एक पटेलांची

SCROLL FOR NEXT