‘एचबीओ'' थेरपीला पसंती
जे. जे. रुग्णालयात १२ वर्षांत १०,६८६ रुग्णांवर उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईतील राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयातील हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी (एचबीओटी) उपचारांतून २०१३ पासून आजपर्यंत एकूण १०,६८६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. कोविड कालावधी वगळता या थेरपी उपचारांसाठी नेहमीच गर्दी दिसून आली. गंभीर जखमांसाठी ही थेरपी महत्त्वपूर्ण ठरते.
वर्षनिहाय आकडेवारीनुसार २०१३ मध्ये ७६० रुग्णांनी या थेरपीचा लाभ घेतला. २०१४ मध्ये ही संख्या १,७४६ इतकी होती. २०१५ मध्ये १,१५३; २०१६ मध्ये ९०४, तर २०१७ मध्ये ६५४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. २०१८ आणि २०१९ मध्ये अनुक्रमे ४१४ व ६२४ रुग्णांवर ही थेरपी करण्यात आली, तर कोविड काळात उपचारांची संख्या घटली. २०२० मध्ये १२२ आणि २०२१ मध्ये १८२ रुग्णांवर उपचार झाले. त्यानंतर पुन्हा वाढ दिसून आली. २०२२ मध्ये ६२६, २०२३ मध्ये १,३०४ आणि २०२४ मध्ये १,०९७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. २०२५ मध्ये आतापर्यंत १,१०० रुग्णांनी या उपचार सुविधेचा लाभ घेतला.
गंभीर जखमा, जळीत रुग्ण, डायबेटिक फूट आणि काही विशिष्ट आजारांमध्ये उपयुक्त ठरणारी ही उपचारपद्धती असून, हजारो रुग्णांसाठी महत्त्वाची ठरत आहे. दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसाठी एचबीओटीचे उपचार मोफत आहेत.
- डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय समूह
वर्ष लाभार्थी संख्या टक्केवारी
२०१३ ७६० ७.११
२०१४ १,७४६ १६.३४
२०१५ १,१५३ १०.७९
२०१६ ९०४ ८.४६
२०१७ ६५४ ६.१२
२०१८ ४१४ ३.८७
२०१९ ६२४ ५.८४
२०२० १२२ १.१४
२०२१ १८२ १.७०
२०२२ ६२६ ५.८६
२०२३ १,३०४ १२.२०
२०२४ १,०९७ १०.२७
२०२५ १,१०० १०.२९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.