मुंबई

साडे पाच लाख मतदारांसाठी लोकशाही महोत्सवाची तयारी

CD

साडे पाच लाख मतदारांसाठी लोकशाही महोत्सवाची तयारी
पनवेल महापालिका प्रशासन सकर्त; उपोषण, मोर्चा, निदर्शनाला मनाई
पनवेल, ता. १६ (वार्ताहर) ः पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून मतदार यादी अंतिम स्वरूपात तयार करण्यापर्यंत सर्व कामकाज सुरू असून जिल्हाधिकारी कार्यालयातून संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे.
पनवेल पालिका निवडणुकीसाठी एकूण ५,४५,५७८ मतदारांसाठी नियोजन करण्यात आले आहे. नुकतीच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्ये निवडणूक कार्यात सहभागी होणार आहेत. सहा निवडणूक निर्णय अधिकारी व एक मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या देखरेखीखाली अंदाजे ३० दिवस हा लोकशाही उत्सव चालणार आहे. आयुक्त मंगेश चितळे यांनी नागरिकांना अधिकाधिक मतदान करण्यासाठी जनजागृतीमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, तसेच आदर्श आचारसंहिता पाळण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे कोणतेही साहित्य लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक जागा, इमारतींची भिंत, सार्वजनिक ठिकाणे व खासगी जागा वापरून पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊट्स किंवा फ्लेक्स लावू नयेत, असे आदेश आहेत. तसेच धार्मिक स्थळे, रुग्णालये व शैक्षणिक संस्था जवळ तात्पुरती पक्ष कार्यालये उभारण्यासही निर्बंध आहेत. नमुना मतपत्रिका छपाईसाठी आयोगाने कागदाचा आकार आणि चिन्ह निश्चित केले असून कोणत्याही उमेदवाराच्या चिन्हासह छपाई करण्यास मनाई आहे.
...........
वाहनांवर प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावण्यास निर्बंध
प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतकांना निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक, झेंडे लावण्यास निर्बंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही; तसेच तो त्या वाहनाच्या टपापासून २ फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही, याची नोंद घेणे गरजेचे आहे. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे, वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire: मुंबईत थरार! ४५ मजली भव्य इमारतीत भीषण आग, काही मिनिटांत खळबळ! व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या अभिनंदन संदेशावर बीएनपीच्या निवडणूक समन्वय समितीचे प्रमुख नझरुल इस्लाम खान यांची प्रतिक्रिया

Jalna News : सरकारी डेटावर डल्ला! आधार, पॅन, गॅस कार्ड, वाहन डिटेल्ससह ई-चालनाची माहिती लिंक; सहा हजार बनावट वेबसाईट सक्रिय

Kolhapur Lake : जुन्या शहराभोवती, व्यवस्था शेतीसाठी; शेतीला पाणी देण्याची पद्धती अनेक शतकाच्या आधीपासूनच अस्तित्वात

Chhatrapati Sambhajinagar News : शिरसाटांचा इगो काही जाईना, म्हणे ‘जंजाळ मुख्यमंत्री होवो’!

SCROLL FOR NEXT