मुंबई

घोडबंदर रोडवर दुभाजकला धडकून पहाटे कंटेनर उलटला

CD

घोडबंदर रोडवर पहाटे कंटेनरला अपघात
वाघबीळ पुलावर डिझेल सांडल्याने वाहतुकीचा खोळंबा
ठाणे, ता. १७ : घोडबंदर रोडवरील वाघबीळ उड्डाणपुलाच्या चढणीवर बुधवारी (ता. १७) पहाटे एक भीषण अपघात घडला. दिल्लीहून न्हावा-शेवाकडे जाणारा कंटेनर दुभाजकाला धडकून उलटल्याने त्यातील तेल (डिझेल) मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरले. या घटनेमुळे ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर दुपारपर्यंत मोठा परिणाम झाला होता.

बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास वाघबीळ उड्डाणपुलाची चढण, घोडबंदर रोड येथे अपघात घडला. ग्यानेंद्र कुमार सिंग हे दिल्लीहून न्हावा-शेवाकडे निघाले होते. या वेळी पुलाच्या चढणीवर कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने तो थेट दुभाजकाला धडकला आणि रस्त्यावर आडवा झाला. अपघाताची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलिसांनी तीन मोठ्या क्रेन मागवून सकाळी ९ वाजेपर्यंत अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या एका बाजूला केला. रस्त्यावर सांडलेल्या तेलामुळे वाहने घसरण्याची शक्यता होती. त्यावर आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने माती पसरवून रस्ता सुरक्षित केला.

वाहनांच्या रांगा
कंटेनर उलटल्याने ठाण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली होती. सकाळी नऊनंतर कंटेनर हटवला असला, तरी वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे दुपारपर्यंत वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने वेळेवर पोहोचून रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही केली. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 4th T20I : शुभमन गिल खेळणार नाही, मैदानातही पोहचला नाही; मोठं कारण आलं समोर

SHANTI Bill: अणुऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा! शांती विधेयक लोकसभेत मंजूर; का ठरणार गेमचेंजर?

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Latest Marathi News Live Update : तेलंगणा विधानसभा अध्यक्षांनी पाच याचिकांच्या संदर्भात अपात्रता याचिका फेटाळून लावली

SCROLL FOR NEXT