मुंबई

भाजप कार्यालयात दारबंद करून पक्ष प्रवेश केल्याचा माजी नगरसेवकाचा आरोप....

CD

माजी नगरसेवकाचा भाजपवर आरोप
जबरदस्तीच्या प्रवेशाचा आरोप; भाजपकडून सीसीटीव्हीचा पलटवार
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) ः पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गट आणि भाजपमध्ये अपक्ष माजी नगरसेवक अरुण गीध यांच्या पक्षप्रवेशावरून जुंपली आहे. अशातच, अरुण गीध यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
माजी नगरसेवक अरुण गीध आणि त्यांच्या भगिनी वंदना गीध यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृतरीत्या प्रवेश केला. या प्रवेशावर भाजपने जोरदार आक्षेप घेत शिंदे गटाला सुनावले होते, परंतु यानंतर गीध यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या कार्यालयाशेजारीच भाजपचे कार्यालय असल्याने मी तिथे सहज गेलो होतो, मात्र तेथे कार्यालयाचे दार बंद करून माझ्या गळ्यात भाजपचा पट्टा टाकण्यात आला. आम्ही भाजप पक्षात प्रवेश केला असता, तर त्यांच्या अनेक कार्यक्रमात आम्हाला सन्मानाने का बोलावले नाही, असा सवाल गीध यांनी उपस्थित केला आहे, तर आमचा अधिकृत प्रवेश शिवसेनेत झाला असल्याचे वंदना गीध यांनी सांगितले.

भाजपकडून व्हिडिओ
दुसरीकडे, भाजपने अरुण गीध यांचे आरोप खोडून काढण्यासाठी २५ ऑगस्टचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये गीध स्व-खुशीने भाजपचा पट्टा घालून प्रवेशाचा अर्ज भरताना दिसत असल्याचा दावा भाजपने केला आहे. आम्ही युती धर्म पाळत असताना मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नगरसेवकांना पक्षात घेणे हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही भाजप नेते नरेंद्र पवार यांनी केली होती.

शिंदे गटाचे प्रत्युत्तर
या प्रकरणावर शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी भाजपची बाजू फेटाळून लावली आहे. नरेंद्र पवार हे केवळ प्रसिद्धीसाठी हे सर्व करत असून, अशा प्रकारे कुणाच्याही गळ्यात पट्टा टाकणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर या गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

IPL 2026 Auction: 'खर्च कसा करणार हा...' CSK ने बोली लावलेल्या प्रशांत वीरसाठी रिंकू सिंगसह UP संघातील खेळाडूंचा बसमध्येच जल्लोष

Mumbai News: मुंबई कोस्टल रोडसाठी 9 हजार झाडे तोडणार! बीएमसीचा मोठा निर्णय; वाचा प्रकल्पाचा सविस्तर आराखडा

Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

SCROLL FOR NEXT