मुंबई

स्वच्छ हवेसाठी युवकांची मानवी साखळी

CD

स्वच्छ हवेसाठी युवकांची मानवी साखळी
वाढत्या वायू प्रदूषणाविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधणार
नवी मुंबई, ता. १६ (सकाळ वृत्तसेवा) : नवी मुंबईत दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेबाबत तीव्र चिंता व्यक्त होत असताना, वाढत्या वायू प्रदूषणाविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक आता मैदानात उतरणार आहेत. वाशी येथील मिना सी-शोर (मिनी समुद्रकिनारा) परिसरात स्वच्छ हवेसाठी मानवी साखळी आंदोलन आयोजित करण्यात आले असून, या उपक्रमातून प्रदूषणकारी घटकांवर कठोर कारवाईची मागणी केली जाणार आहे.
वाशी सेक्टर १०-ए येथील मिनी समुद्रकिनाऱ्यावर सकाळी ७ ते ९ या वेळेत ही मानवी साखळी उभारली जाणार आहे. ‘उर्वरी’ आणि ‘नॅटकनेक्ट फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन तासांच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कोणताही निषेध मोर्चा नसून, हवेच्या खालावलेल्या दर्जाबाबत आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत व्यक्त होणारी सामूहिक सार्वजनिक चिंता असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या मानवी साखळीच्या माध्यमातून नवी मुंबईतील हवेचे प्रदूषण वाढविणाऱ्या विविध स्रोतांकडे लक्ष वेधले जाणार आहे. यामध्ये अनियंत्रित औद्योगिक वायू प्रदूषण, बेफिकीर उत्खनन, राष्ट्रीय महामार्ग ३४८ वरील उरण–पनवेल रस्त्यालगत वाढलेले रेडी-मिक्स काँक्रीट प्लांट, तसेच दाट काळा धूर सोडणाऱ्या जुन्या व खराब अवस्थेतील डंप ट्रक व व्यावसायिक वाहनांची वाहतूक यांचा समावेश असल्याचे उर्वरीच्या संचालिका वसुंधरा गुप्ते यांनी सांगितले.
.....................
श्वसनविकाराचा धोका
मोठ्या प्रमाणावरील पुनर्विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा उभारणी आणि रस्ते रुंदीकरणामुळे निर्माण होणारी बांधकामाची धूळ हीदेखील गंभीर समस्या ठरत आहे. धूळ नियंत्रण नियम व उत्सर्जन मानकांची अपुरी अंमलबजावणी यामुळे आरोग्याचा धोका वाढत असून, त्याचा फटका विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना बसत असल्याचे उर्वरीच्या समन्वयक सिया गुप्ता यांनी नमूद केले. तर नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी ढासळत्या हवेच्या गुणवत्तेमुळे दैनंदिन जीवनशैलीत बदल करावा लागत असल्याचे सांगितले. मी माझी सकाळची फिरायला जाण्याची सवयच सोडली आहे, असे सांगत त्यांनी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Resign: राजकीय उलथापालथ! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; क्रीडा खात्याची जबाबदारी कुणाकडे?

IND vs SA, T20I: भारत-दक्षिण आफ्रिका संघातील लखनौत होणारा चौथा सामना रद्द; कारण घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : कुंद्रा दाम्पत्यावर फसवणुकीचे कलम

Video: परिस्थितीमुळे क्रिकेट सोडायण्याचा विचार, पण वडिलांची खंबीर साथ; IPL 2026 संधी मिळालेल्या ठाण्याच्या पोराची भावनिक कहाणी

Vasai Virar Election : वसई-विरार महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती जाहीर; जागावाटपावर मात्र संभ्रम कायम!

SCROLL FOR NEXT