मुंबई

दिवाणी दावा निकाली काढण्यासाठी ७४ लाखांची फसवणुक

CD

दिवाणी दावा निकाली काढण्यासाठी ७४ लाखांची फसवणूक
मुख्यमंत्र्याच्या तोतया पीएविरुद्ध गुन्हा दाखल
अंधेरी, ता. १७ (बातमीदार) ः दिवाणी दावा निकाली काढण्यासाठी एका व्यावसायिकाकडून घेतलेल्या सुमारे ७४ लाखांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी वैभव परेश ठक्कर या भामट्याविरुद्ध सांताक्रूझ पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला आहे. वैभवने तो मुख्यमंत्र्याचा खासगी स्वीय सहाय्यक तसेच त्याची पत्नी आयपीएस अधिकारी असून, ती सध्या मुंबई पोलिस दलात पोलिस उपायुक्त म्हणून काम करत असल्याची बतावणी करून ही फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले.
वैभव हा फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून, त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. ३७ वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून, ते सांताक्रूझ येथे त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहतात. काही महन्यांपूर्वी त्यांनी सतीश शर्मा याच्याविरुद्ध दिंडोशी सत्र न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता. याचदरम्यान त्यांच्या एका मित्राने त्यांची वैभव ठक्करविषयी माहिती दिली होती. या माहितीनंतर त्यांनी वैभवची भेट घेतली होती. या भेटीत त्याने तो मुख्यमंत्र्यांचा खासगी स्वीय सहाय्यक असून, त्याची पत्नी आयपीएस अधिकारी आहे. सध्या ती मुंबई पोलिस दलात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत आहे. त्याच्या अनेक ठिकाणी चांगल्या ओळखी असून त्यांना दिवाणी दाव्यात मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
वैभव हा एका महागड्या कारमधून खासगी सुरक्षा रक्षकासोबत आला होता. त्यामुळे त्यांना खरोखरच तो मुख्यमंत्र्याचा खासगी स्वीय सहाय्यक असल्याचे वाटले होते. मार्च महिन्यात त्याने त्यांना कॉल करून त्यांचे चारही दिवाणी दावे निकाली काढण्यासाठी पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला टप्प्याटप्प्याने ७४ लाख रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतरही तो त्यांच्याकडे आणखीन पैशांची मागणी करत होता, मात्र त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यांच्या कामासाठी त्यांनी त्याला ७४ लाख रुपये दिले होते. उर्वरित ७६ लाख रुपये दिले नाहीत, तर त्यांच्या दिवाणी दाव्याच्या केसचा निकाल त्यांच्या विरोधात लावण्याची धमकी देऊ लागला. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरू केली होती, मात्र त्याने त्यांना पैसे दिले नाही. त्‍यानंतर त्‍यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update :धावत्या ट्रेनमधून वैतरणा नदीत पडला तरुण, सतर्कतेमुळे जीव वाचला

SCROLL FOR NEXT