मुंबई

भिवंडीत इच्छुकांची भाऊगर्दी

CD

उमेदवारीसाठी इच्छुकांची ''भाऊगर्दी''
एकाच उमेदवाराचे अनेक पक्षांकडे अर्ज!

भिवंडी, ता. १७ (वार्ताहर) : महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच भिवंडीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, आपली जागा सुरक्षित करण्यासाठी काही इच्छुकांनी चक्क एकापेक्षा अधिक पक्षांकडे उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे रंजक चित्र समोर आले आहे.

विविध राजकीय पक्षांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी रांग लावली आहे. समाजवादी पार्टीकडे १७७ , काँग्रेसकडे १५६ , भाजपकडे १५०, शिवसेना (ठाकरे गट) ३५ अर्ज दाखल झाले आहेत.शहरात दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने काँग्रेसकडून लढण्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतींनंतर उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी दिली.

आमदार रईस शेख यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर ''सपा''कडे इच्छुकांचा ओघ मोठा आहे. मात्र, अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष अबू असीम आजमी घेतील, असे पक्षाचे निवडणूक प्रभारी अजय यादव यांनी स्पष्ट केले. तर केंद्र आणि राज्यातील सत्ता पाहता, भिवंडीतही भाजपची सत्ता आणण्यासाठी मतदार उत्सुक असल्याचा दावा शहराध्यक्ष रवी सावंत यांनी केला असून, त्यामुळेच इच्छुकांनी मोठी रीघ लावल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवारांची ''दुहेरी'' खेळी?
निवडणूक कार्यक्रमाची घोषणा घाईगडबडीत झाल्याने अनेक उमेदवार संभ्रमात आहेत. त्यामुळे ''तिकीट कोणत्याही पक्षाकडून मिळाले तरी चालेल'' अशा मानसिकतेतून अनेक इच्छुकांनी काँग्रेस, भाजप आणि समाजवादी अशा वेगवेगळ्या पक्ष कार्यालयांमधून उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. यामुळे पक्ष बदलण्याच्या हालचालींनाही वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Resign: राजकीय उलथापालथ! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; क्रीडा खात्याची जबाबदारी कुणाकडे?

IND vs SA, T20I: भारत-दक्षिण आफ्रिका संघातील लखनौत होणारा चौथा सामना रद्द; कारण घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : कुंद्रा दाम्पत्यावर फसवणुकीचे कलम

Video: परिस्थितीमुळे क्रिकेट सोडायण्याचा विचार, पण वडिलांची खंबीर साथ; IPL 2026 संधी मिळालेल्या ठाण्याच्या पोराची भावनिक कहाणी

Vasai Virar Election : वसई-विरार महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती जाहीर; जागावाटपावर मात्र संभ्रम कायम!

SCROLL FOR NEXT