कम्युनिस्ट पक्ष प्रलोभनाला बळी पडला नाही
माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे उद्गार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : ब्रिटिश सत्ताकाळात असेल किंवा त्या नंतरच्या सत्ता काळात, किती तरी दडपशाही अवलंबिली गेली तरी कम्युनिस्ट पक्ष कोणत्याही प्रलोभनाला बळी पडलेला नाही आणि श्रमिकांच्या प्रश्नापासून कधीही दूर गेलेला नाही. त्यामुळेच आज हा पक्ष कामगारवर्गामध्ये ताठ मानेने उभा आहे, असे परखड विचार माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मांडले. कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी महोत्सवाच्या औचित्याने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दीवर्षानिमित्त भायखळा, कामाठीपुरा, ताडदेव शाखेच्या वतीने ना. म. जोशी मार्गावर नुकतीच जाहीर सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मुंबई कौन्सिलचे सचिव कॉ. मिलिंद रानडे होते. भालचंद्र मुणगेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, शंभर वर्षांत कम्युनिस्ट पक्षाने पददलित, श्रमिकांवर असलेली आपली निष्ठा, कधीही ढळू दिली नाही, तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यामुळे हा पक्ष इतरांहून वेगळा राहिला आहे. या कार्यक्रमात क्रांती जेजूरकर आणि प्रकाश रेड्डी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या सभेला खास उपस्थित असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. उदय भट, गिरणी कामगार नेते सत्यवान उभे, बाळ खवणेकर, ॲड. बबन मोरे, गुलाबराव जगताप, माथाडी कामगार नेते यांनी कॉ. अमृत श्रीपाद डांगे यांच्या लढ्याच्या आठवणी जागवून कम्युनिस्ट पक्षाला शुभेच्छा दिल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र कौन्सिलचे सचिव सुभाष लांडे म्हणाले, आता जातीयवादी सरकारविरुद्ध, समविचारी पक्षांनी लढणे गरजेचे आहे. फडणवीस सरकार जाती-जातीमध्ये आणि हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडून राजकारण करीत आहे.या विषारी राजकारणाविरुद्ध लढण्यासाठी तयार राहण्याचे त्यांनी सर्वांना आवाहन केले.
भाजपसारखे जातीयवादी सरकार सत्तेवरून खाली खेचेपर्यंत आम्ही लढत राहणार आहोत, असे भाकपचे मुंबई कौन्सिलचे सचिव मिलिंद रानडे म्हणाले.
...
सुकुमार दामले, इंटकचे बजरंग चव्हाण, संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे नेते रमाकांत बने आदी विविध पक्षाच्या कामगार नेत्यांनी उपस्थित राहून कम्युनिस्ट पक्षाला शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने क्रांतिसिंह नाना पाटील, बाबूराव जगताप, सरस्वती जगताप, लोकशाहीर अमर शेख, गुलाबराव गणाचार्य, जी. एल. रेड्डी, तारा रेड्डी या नामवंताना मरणोत्तर जीवन गौरव
देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला कॉ. क्रांती जेजुरकर यांनी प्रास्ताविक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.