मुंबई

ग्राममंगलमध्ये बालशिक्षणाचे मूलभूत कार्य

CD

ग्राममंगलमध्ये बालशिक्षणाचे मूलभूत कार्य
डॉ. अनिल काकोडकर यांचे कौतुकोद्गार

कासा, ता. २० (बातमीदार) : ग्राममंगलमध्ये बालशिक्षणाचे मूलभूत आणि महत्त्वपूर्ण कार्य होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणात बालशिक्षणाला विशेष महत्त्व असून, केवळ शाळा-महाविद्यालये चालवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. ग्राममंगलसारख्या संस्थांचे कार्य ग्रामीण भागासाठी दिशादर्शक असून, नव्या कलादालनामुळे शिक्षणाला अधिक अर्थ प्राप्त होईल, असा विश्वास प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला. ग्राममंगलच्या ४५व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी ग्राममंगल एना परिसरातील मुक्त शाळेत या कलादालनाचे उद्घाटन डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग आणि शैक्षणिक नमुने विकसित करणारी ग्राममंगल संस्था कला, क्रीडा आणि कौशल्य या प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र केंद्र उभारण्याच्या दिशेने कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कलाकुटीर या कला प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.
बालवाडी स्तर उंचावणे, मुक्त शाळा संकल्पना, अध्ययन-अध्यापन गुणवत्ता विकास प्रकल्प, शैक्षणिक साधन व पुस्तक निर्मिती तसेच शिक्षक, संस्थाचालक आणि पालकांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे काम ग्राममंगलतर्फे नियमितपणे केले जाते. शासन व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्या साहित्याचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन केले जाते.
ग्राममंगलचे संस्थापक व नवीन शैक्षणिक धोरणाचे प्रणेते रमेश पानशे यांनी आनंददायी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करीत ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षक परिपूर्ण घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.
ठाणे येथील तेजश्री अत्रे-मुळे, कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कथ्थक नृत्यातून विविध पारंपरिक कथांचे प्रभावी सादरीकरण केले. तसेच कलादालनाची अभिनव रचना करणारे प्रसिद्ध वास्तुविशारद प्रतीक धानमेर यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.


हस्तकला वस्तू निर्मिती

कलाकुटीर या कला प्रशिक्षण केंद्रात आदिवासी वारली चित्रकला, बांबूकला व विविध हस्तकला वस्तू निर्मितीचा समावेश आहे. यासोबतच ग्राममंगल परिसरात कौशल्य विकास केंद्राची उभारणी सुरू असून, शास्त्रीय संगीताचे धडेही दिले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत वाढवली; नवीन तारीख काय? जाणून घ्या...

Kudal Zilla Parishad Election Result : कुडाळवर भगवा फडकला! भाजपच्या जयश्रीताईंचा 6716 मतांनी ऐतिहासिक विजय; पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: विजयानंतर महाराष्ट्र भाजप प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले

BJP win ZP, Panchayat Samiti Elections : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपच अव्वल!, निकालांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहसिन नक्वीची नवी मागणी! India vs Pakistan मॅच हवी असेल तर तिरंगी मालिका खेळवा; ज्यामध्ये भारत, पाकिस्तान अन्...

SCROLL FOR NEXT