मुंबई

स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानाची दयनीय अवस्था; मुलांसह पालकांचा हिरमोड

CD

स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानाची दयनीय अवस्था; मुलांसह पालकांचा हिरमोड
कांदिवली, ता. २० (बातमीदार) : मालाड पूर्व येथील जानू भोये नगरमधील बृहन्मुंबई महापालिकेच्या पी/उत्तर विभागाअंतर्गत येणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दयनीय अवस्थेत पोहोचले आहे. मैदानातील लहान मुलांच्या खेळण्यांचे साहित्य तुटले असून, परिसरात ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मुलांसह पालक आणि नागरिकांचा मोठा हिरमोड होत आहे.
या मैदानात आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक, पालक व लहान मुले दररोज विरंगुळ्यासाठी येतात. मात्र खेळण्यांच्या परिसरातील महागडे फ्लोरिंग उखडले असून, उंचसखलपणा निर्माण झाला आहे. त्यामुळे खेळताना मुले पडून किरकोळ जखमी होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. खेळण्यासाठी अन्य पर्याय नसल्याने पालकांना नाइलाजाने याच मैदानात मुलांना आणावे लागत आहे.
मैदानाच्या संरक्षण भिंतीचे व संपूर्ण मैदानाचे नूतनीकरण माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत २०२३–२४मध्ये करण्यात आले होते. मात्र अवघ्या एका वर्षातच मैदानाची अशी दुर्दशा झाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मैदानात बसण्यासाठी आसने व चालण्यासाठी मार्ग तयार करण्यात आले असले, तरी अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळू शकला नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

सुशोभीकरण करा
या मैदानावर जॉगिंग ट्रॅक, कुंपण भिंत, मुलांची खेळणी तसेच व्यायामासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच झाडे, झुडपे व फुलझाडे लावून मैदानाचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते सुशांत गिरी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT