मुंबई

वालधुनी उड्डाणपूल तीन आठवडे बंद

CD

वालधुनी उड्डाणपूल तीन आठवडे बंद
२० डिसेंबर ते १० जानेवारीपर्यंत वाहतूक बदल; कल्याणकरांना कोंडीचा मनस्ताप

कल्याण, ता. २० (बातमीदार) : कल्याण आणि उल्हासनगरला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या सुभाषचंद्र बोस वालधुनी उड्डाणपुलाच्या डांबरीकरण आणि दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या कामासाठी शनिवारपासून (ता. २०) १० जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात पुलाचा जुना डांबराचा थर काढून नवीन डांबरीकरण आणि तांत्रिक दुरुस्ती केली जाणार आहे.

कल्याण वाहतूक उपविभागाने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. स्व. आनंद दिघे पुलावरून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांना सम्राट चौकात प्रवेश बंद राहील. ही वाहने उजवीकडे वळून उल्हासनगरमार्गे इच्छितस्थळी जातील. वालधुनी पुलावरून पूर्वेकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद आहे. ही वाहने प्रेम ऑटोमार्गे उल्हासनगरकडे जातील, तर कल्याण पूर्वेत जाण्यासाठी पत्रीपुलाचा वापर करावा लागेल. उल्हासनगरहून वालधुनी पुलाकडे येणारी वाहतूक सम्राट चौकात बंद करण्यात आली आहे. ही वाहने डावीकडे वळून कल्याण पूर्वेतून मार्गस्थ होतील. पोलिस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन गॅस वाहने यांसारख्या अत्यावश्यक सेवांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे.

तांत्रिक दुरुस्तीचे स्वरूप
पुलावरील डांबरीकरणासोबतच ‘बेअरिंग रिप्लेसमेंट’ आणि ‘एक्सपान्शन जॉइंट’ बदलण्याचे कामही केले जाणार आहे. पुलाची मजबुती आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, उष्णता व थंडीमुळे होणाऱ्या विस्ताराचा पुलावर परिणाम होऊ नये, यासाठी ही दुरुस्ती केली जात आहे.

निवडणुकीच्या काळात कोंडीचा धोका
शहरात सध्या अनेक विकासकामे सुरू असल्याने नागरिक आधीच वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. अशातच महापालिका निवडणुकांचा काळ आणि राजकीय नेत्यांचे दौरे पाहता, वालधुनी पूल बंद ठेवल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, असा सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परभणीत ठाकरेंकडून सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

प्राजक्ता माळीचा चेहरा सेम वडिलांसारखा, नाक, डोळे सुद्धा जसेच्या तसे, सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत

Love Story : एक 'ब्लाइंड डेट' ठरली प्रेमाचे कारण! महाराष्ट्रीयन-दक्षिण भारतीय संस्कृतींना जोडणारे प्रेमबंध, अवघ्या पाच महिन्यांत घेतला लग्नाचा निर्णय!

Viral Video: मॉलमध्ये अचानक बायकोची एंट्री, नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहतांच दोघींनी उपटल्या एकमेकांच्या झिंझ्या

SCROLL FOR NEXT