निवडणुकीसाठी प्रशासन अलर्ट मोडवर
आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी आखला १९ कलमी कार्यक्रम
उल्हासनगर, ता. २० (बातमीदार) ः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. निवडणुका निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी आयुक्तांनी निवडणूक, पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन रणनीती स्पष्ट केली आहे.
निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी आयुक्तांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम तैनात केली आहे. तर एक खिडकी योजना, प्रचार सभा व मिरवणुकांसाठी परवानगी प्रक्रिया, स्ट्राँग रूमची व्यवस्था व सुरक्षा, निवडणूक कार्यालयासाठी संगणक, फर्निचर व इतर आवश्यक साहित्याची उपलब्धता, विद्युत व्यवस्था व वीजपुरवठ्याची सातत्यपूर्ण व्यवस्था, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदान केंद्रांवरील भौतिक सुविधा (वीज, पाणी, शौचालय, रॅम्प इत्यादी), सुरक्षा यंत्रणा, जीपीएस व सीसीटीव्ही यंत्रणा सर्व कार्यालयांत लावणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सोयी, सुरक्षा व वाहतूक नियोजन, उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर देखरेख यंत्रणा, संवेदनशील प्रभाग व मतदान केंद्रांची ओळख, आदर्श आचारसंहिता भंग व गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, मतमोजणी केंद्र निश्चिती व व्यवस्था, मतदान साहित्य वितरणाचे नियोजन, वाहन प्रणाली यांचा समावेश आहे.
या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे, अनंत जवादवार, स्नेहा करपे, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी, उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड, मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे, विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी, हिललाइन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप शिवले, जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, नोडल अधिकारी गणेश शिंपी, सहाय्यक आयुक्त अलका पवार, विशाल कदम, शहर अभियंता हनुमंत खरात आदी अधिकारी उपस्थित होते.
पोलिस आणि प्रशासन यांचा समन्वय
निवडणूक काळात पोलिस विभागाने पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांशी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधावा, अशा सूचना मनीषा आव्हाळे यांनी दिल्या आहेत. लोकशाहीच्या मूल्यांचे जतन करीत सुरक्षित निवडणूक पार पाडणे हे सर्वांचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.