मुंबई

मिरा-भाईंदरमध्ये ‘मविआ’ सक्रिय

CD

मिरा-भाईंदरमध्ये ‘मविआ’ सक्रिय
ठाकरे गट, मनसे, काँग्रसेमध्ये जागावाटपावरून चर्चा
भाईंदर, ता.२३ (बातमीदार): मिरा-भाईंदर पालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जागा वाटपाचे सूत्र अंतिम झाले आहे. आता दोन्ही पक्षांची काँग्रेससोबत जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे निवडणुकांसाठी मविआ सक्रिय झाली आहे.
मुंबईत शिवसेना ठाकरे गट व मनसेचे मनोमिलन झाले आहे. त्यानुसार मिरा-भाईंदरमध्येही दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. दुसरीकडे काँग्रेसनेही स्थानिक पातळीवर मनसेला काही दिवसांपूर्वीच मविआमध्ये सहभागी करुन घेतले आहे. त्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरुन चर्चा सुरु आहेत. त्यापैकी शिवसेना, मनसे यांनी आपसात जागावाटपाचे सूत्र निश्चित केले आहे. महापालिकेच्या एकंदर ९५ जागांपैकी मनसेकडे ३८ जागांवर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली होती. त्यापैकी मराठी भाषिकांची संख्या अधिक असलेल्या तसेच मनसेला मानणारा १५ ते १६ मतदार संघाची मागणी मनसेने शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसकडे केली होती. या जागा मनसेला देण्याचे मान्य केले आहे. तर उर्वरित सर्व जागांवर लढण्याची ठाकरे गटाची तयारी आहे. तर काँग्रेससोबतही चर्चा सुरु आहे.
----------------------
मुलाखती सुरु
येत्या दोन तीन दिवसांत चर्चेची अंतिम फेरी होऊन तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप निश्चित होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसने निवडणूक लढवणाऱ्यांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. येत्या एक दोन दिवसात जागावाटपाचा अंतिम निर्णय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

अर्जुन आणि सायलीचा रोमँटिक व्हॅलेंटाईन! सायलीनं दिलं खास सप्राईज, Tharla Tar Mag चा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

Pune Weather : पुढील दोन दिवस पुण्यात उकाडा कायम; सकाळी आणि रात्री काहीसा गारवा

Viral Video : वडिलांनी घरात सगळ्यांसमोर वाचलं मुलाच्या गर्लफ्रेंडचं लव्ह लेटर,पुढं असं घडलं असं काही... व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

SCROLL FOR NEXT