मुंबई

दहशतवादी हल्ल्याविरोधात रणनिती

CD

दहशतवादी हल्ल्याविरोधात रणनिती
डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरात कासा पोलिसांचे मॉकड्रिल
कासा, ता.२३ (बातमीदार)ः डहाणू येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात दहशतवाद, अतिरेकी हल्ल्याच्या संभाव्य धोक्याच्या अनुषंगाने कासा पोलिस ठाण्याच्यावतीने मॉकड्रिल करण्यात आले. या सरावात जलद प्रतिसाद पथक सहभागी झाले होते.
आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची तयारी, प्रतिसादक्षमता व विविध यंत्रणांमधील समन्वयाची चाचणी घेण्यात आली. सरावादरम्यान मंदिर परिसरात चार अतिरेकी आरडीएक्स व शस्त्रांसह घुसल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. अशा प्रसंगी अतिरेक्यांना वेढा घालून जेरबंद कसे करायचे, नागरिकांची सुरक्षितता कशी सुनिश्चित करायची तसेच परिसरावर नियंत्रण कसे मिळवायचे, याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मॉकड्रिलच्या कालावधीत काही काळासाठी मंदिर परिसरात प्रवेशबंदी लागू करण्यात आली होती.
-----------------------------
सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्व
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेले श्री महालक्ष्मी मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी, त्वरित कारवाई करता यावी, या उद्देशानेच ही मॉकड्रिल आयोजित करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमर पाटील यांनी दिली. या वेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख, ट्रस्टचे कार्यकारिणी सदस्य, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

अर्जुन आणि सायलीचा रोमँटिक व्हॅलेंटाईन! सायलीनं दिलं खास सप्राईज, Tharla Tar Mag चा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

Pune Weather : पुढील दोन दिवस पुण्यात उकाडा कायम; सकाळी आणि रात्री काहीसा गारवा

Viral Video : वडिलांनी घरात सगळ्यांसमोर वाचलं मुलाच्या गर्लफ्रेंडचं लव्ह लेटर,पुढं असं घडलं असं काही... व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

SCROLL FOR NEXT