मुंबई

थंडीची चाहूल वाढताच गुळाला मागणी

CD

तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : हिवाळ्याची चाहूल लागताच गुळाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देणारा व आरोग्यास फायदेशीर मानला जाणारा गूळ नागरिकांच्या पसंतीस उतरला असून, बाजारपेठांमध्ये गुळाची विक्री चांगलीच वाढली आहे. विशेषतः पातळ पोळी, भाजी, तीळगूळ, चहा व औषधी उपयोगासाठी गुळाचा वापर वाढल्याने किरकोळ व घाऊक बाजारात उलाढाल वाढली आहे. सध्या सेंद्रिय व देशी गुळाला अधिक मागणी असून, दर्जेदार गुळासाठी ग्राहक थोडी जास्त किंमत मोजण्यासही तयार आहेत.

व्यापाऱ्यांच्या मते, मागणी वाढल्याने गुळाच्या भावात सौम्य वाढ झाली असली तरी पुढील काही आठवड्यांत भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने बाजारात नव्या गुळाची आवक वाढत असून, त्यामुळे ग्राहकांना ताजा गूळ उपलब्ध होत आहे. एकूणच, आरोग्याबाबत वाढलेली जागरूकता आणि हिवाळी पदार्थांची मागणी यामुळे यंदा गुळाचा बाजार तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे. पुढच्या महिन्यात मकर संक्रात असल्याने आणखीन गुळाच्या मागणीत वाढ होणार असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.

एपीएमसी घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा गूळ ५० ते ५८ रुपये भावाने विकला जातो, तर कमी प्रतीचा गूळ ४३ ते ४४ रुपये प्रति किलो विकला जातो. सातारा, सांगली, तसेच कोल्हापूर या जिल्ह्यातून बाजारात येणारा गूळ येतो. गुळाचे भाव वाढले नसून मागणी अधिक वाढली असल्याचे घाऊक व्यापारी प्रशांत मेहता यांनी सांगितले.

आरोग्यासाठी वर्धक
साखरेपेक्षा गूळ आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने गुळाला अधिक प्राधान्य दिले जाते. मधुमेह असणाऱ्यांना तर गुळाचे पदार्थ आरोग्यासाठी वरदान ठरले जातात. साखर शरीरासाठी घातक असल्याने बहुतांशी साखरेचे पदार्थ वर्ज्य केले जातात. त्यामुळे गुळाची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Fraud Case : जयसिंगपुरात जादा परताव्याच्या आमिषाने पावणेसात कोटींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : देशाच्या तपास यंत्रणांवर आमचा विश्वास नाही- संजय राऊत

Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात! IT शेअर्सला मोठा फटका, अमेरिकेचा परिणाम; कोणते शेअर्स घसरले?

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT