मुंबई

डहाणूमध्ये अवैध सावकारीचा आणखी एक बळी

CD

पाच खासगी सावकारांविरोधात गुन्हा
चिंचणीतील डायमेकिंग व्यावसायिकाची आत्महत्या

डहाणू, ता. २३ (बातमीदार) ः तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध खासगी सावकारीच्या जाळ्याने आणखी एका कष्टकरी उद्योजकाचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अमानुष व्याजदर, सातत्याचा मानसिक छळ, शिवीगाळ व धमक्यांना कंटाळून एका डायमेकिंग व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमुळे अवैध सावकारीचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी पाच खासगी सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा वाणगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जय किशोर दवणे (चिंचणी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील किशोर दवणे हे डायमेकिंग व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. व्यवसायवाढीसाठी त्यांनी नवीन वायरकट मशीन खरेदी केली होती. तसेच वर्कशॉपचे नूतनीकरणही केले होते. यासाठी विविध ठिकाणांहून कर्ज घेतले होते. मात्र, व्यवसायात आलेल्या मंदीमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य होत नव्हते.

मानसिक ताण वाढला
या आर्थिक अडचणीच्या काळात त्यांनी काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. सुरुवातीला मदतीचा हात वाटणारी ही रक्कम पुढे जाचक ठरली. घेतलेल्या पैशांपेक्षा अधिक रक्कम परत देऊनही व्याज थकल्याचे सांगत संबंधित सावकारांकडून सातत्याने फोनवरून मानसिक छळ, शिवीगाळ व धमक्या दिल्या जात होत्या. रस्त्यात अडवून चारचौघांत अपमान केल्याने दवणे यांचा मानसिक ताण वाढला होता. अखेर या त्रासाला कंटाळून २ ऑगस्ट २०२५ ला त्यांनी घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

आत्महत्येचा निर्णय
मात्र ११ ऑगस्टला घराची साफसफाई सुरू असताना बेडखाली तीन पानी सुसाईड नोट आढळली. या नोटमध्ये अवैध व्याज व्यवहार, सातत्याचा मानसिक छळ व धमक्यांमुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. नितीन उमराव जैन (वाणगाव), इंद्रदेव विश्वनाथ गुप्ता (चिंचणी), तुषार हरेश साळसकर (चिंचणी), अरविंद रखमाजी पाटील उर्फ पिंटा (अंधेरी, मुंबई) व मंगेश भालचंद्र चुरी (चिंचणी) या पाच खासगी सावकारांची नावे स्पष्टपणे लिहिण्यात आली आहेत.

यानंतर मृताचा मुलगा जय दवणे यांच्या तक्रारीवरून २० डिसेंबरला वाणगाव पोलिस ठाण्यात संबंधित पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयीत फरार आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Call of Duty creator accident Video : ‘कॉल ऑफ ड्यूटी’चे निर्माते विन्स झॅम्पेला यांचे भयानक अपघातात निधन!

Pune Traffic Diversion : नाताळ सणानिमित्त लष्कर परिसरात वाहतूक बदल; एम. जी. रोडवर निर्बंध!

Pakistan Airline Sold: कंगाल पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सची झाली विक्री!

Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादीत चर्चा सुरू; मात्र प्रस्ताव नाही– सुप्रिया सुळे यांचा स्पष्ट खुलासा!

Mundhwa Land Scam : पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- अंजली दमानिया; मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण!

SCROLL FOR NEXT