मुंबई

२५ डिसेंबरला नवी मुंबईहून ३० विमान उडणार

CD

२५ डिसेंबरला नवी मुंबईतून ३० विमाने उडणार
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सिडकोची ऐतिहासिक झेप
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या देशातील अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळाच्या यशस्वी उभारणीने भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा एक अध्याय जोडला गेला आहे. सिडकोची दूरदृष्टी, चिकाटी आणि सक्षम अंमलबजावणीचे हे भव्य प्रतीक असून, २५ डिसेंबरला येथून पहिली विमानसेवा सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ३० विमाने उडणार आहेत. नवी मुंबई, महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे.
नियोजनापासून प्रत्यक्ष कार्यान्वित होईपर्यंत अनेक दशकांचा प्रवास असलेल्या या प्रकल्पामध्ये अत्यंत काटेकोर नियोजन, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. नियोजित मल्टिएअरपोर्ट प्रणाली अधिक सक्षम होणार आहे.

अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक
सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कमळाकृती संकल्पनेवर आधारित अत्यंत आकर्षक टर्मिनल रचनेसाठी अदाणी समूह तसेच एनएमआयएएल यांचे मनःपूर्वक आभार नोंदविले आहेत. ही भव्य रचना आता विमानतळाची एक प्रभावी वास्तुशिल्पीय ओळख बनली आहे. भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडविण्यासोबतच शाश्वत विकास, नवोन्मेष आणि जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक ठरते.

मानदंड ठरला
महाराष्ट्र शासनाने सिडकोसोबत मिळून या ऐतिहासिक प्रकल्पासाठी आवश्यक ठरलेल्या उत्कृष्ट समन्वय आणि सामायिक दूरदृष्टीची दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासन, सिडको, अदाणी समूह आणि एनएमआयएल यांच्यातील सुरळीत व प्रभावी समन्वयामुळे आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक विमानतळ पायाभूत सुविधांचा एक मानदंड ठरला असून, महाराष्ट्र व देशासाठी अभिमानास्पद नवे प्रवेशद्वार म्हणून उभा राहिला आहे.
---
हा विमानतळ कार्यान्वित झाल्याने नवी मुंबईतील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुलभ होणार आहे. पुणे, ठाणे, पनवेल, रायगड तसेच कोकणातील इतर भागांतील नागरिकांनाही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी मोठा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती, पर्यटनवृद्धी आणि औद्योगिक व व्यापारी गुंतवणुकीलादेखील चालना मिळणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. महामार्ग, द्रुतगती मार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो मार्गिका तसेच प्रस्तावित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे विमानतळाकडे विविध दिशांनी सहज व सुरळीत पोहोचणे शक्य होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. अत्याधुनिक सुविधा, पर्यावरणपूरक रचना आणि भविष्यातील वाढ लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राला नवे परिमाण देत देशाचे नवे प्रवेशद्वार म्हणून उदयास येणार आहे.
-------------------------------------------
कोट
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनास प्रारंभ होणे हे महाराष्ट्र शासन व सिडकोची पायाभूत सुविधा विकासाबाबत सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित करते. हा प्रकल्प सिडकोच्या बांधिलकीची हमी देत असून, भविष्योन्मुख पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास आणि जागतिक स्तरावर कनेक्टिव्हिटीसाठी आमची कटिबद्धता अधोरेखित करतो. या प्रवासात विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे हे सामूहिक यश आहे.
- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक
------------------------------------------

पहिल्या दिवशीची विमानसेवा - २५ डिसेंबर २०२५

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

एकूण विमान संचालन - पहिल्या दिवशी एकूण ३० एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स

विमान कंपनी - इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस, आकासा एअर व स्टार एअर
-----------------------------------------------
महत्त्वाच्या उड्डाण वेळा :

पहिले आगमन : ६ E ४६० - बंगळूर येथून - सकाळी ०८.०० वाजता

पहिले प्रस्थान : ६ E ८८२ - हैदराबादकडे - सकाळी ०८.४० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Call of Duty creator accident Video : ‘कॉल ऑफ ड्यूटी’चे निर्माते विन्स झॅम्पेला यांचे भयानक अपघातात निधन!

Pune Traffic Diversion : नाताळ सणानिमित्त लष्कर परिसरात वाहतूक बदल; एम. जी. रोडवर निर्बंध!

Pakistan Airline Sold: कंगाल पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सची झाली विक्री!

Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादीत चर्चा सुरू; मात्र प्रस्ताव नाही– सुप्रिया सुळे यांचा स्पष्ट खुलासा!

Mundhwa Land Scam : पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- अंजली दमानिया; मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण!

SCROLL FOR NEXT