मुंबई

गोवेली ग्रामीण रुग्णालय परिसरात नर्सचा उंचावरून पडून मृत्यू

CD

गोवेलीत इमारतीवरून पडून नर्सचा मृत्यू
टिटवाळा, ता. २४ (वार्ताहर) : कल्याण तालुक्यातील गोवेली येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात एका परिचारिकेचा (नर्स) इमारतीच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कामिनी गायकवाड असे या मृत परिचारिकेचे नाव असून, त्या राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवरून पडल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामिनी गायकवाड या मूळच्या नाशिक जिल्ह्यातील असून, गेल्या काही काळापासून गोवेली परिसरातच वास्तव्यास होत्या. रविवारी (ता. २१) दुपारच्या सुमारास त्या इमारतीच्या टेरेसवर झाडांना पाणी घालण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी त्यांचा पाय घसरल्याने किंवा अन्य कारणाने तोल जाऊन त्या खाली कोसळल्या असाव्यात, असा अहवाल प्रथमदर्शनी सादर करण्यात आला आहे. सायंकाळच्या सुमारास परिसरात काम करणाऱ्या मजुरांना त्यांचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पीएम) पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

मानसिक तणाव
कामिनी गायकवाड यांनी कोरोनाच्या कठीण काळात गोवेली ग्रामीण रुग्णालयात फ्रंटलाइन वर्कर म्हणून अत्यंत मोलाची सेवा बजावली होती. कोरोना काळ संपल्यानंतर त्यांची बदली ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथे झाली होती. मात्र, गेल्या दिवसांपासून रजेवर होत्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या काहीशा मानसिक तणावाखाली होत्या, असेही त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत वाढवली; नवीन तारीख काय? जाणून घ्या...

Kudal Zilla Parishad Election Result : कुडाळवर भगवा फडकला! भाजपच्या जयश्रीताईंचा 6716 मतांनी ऐतिहासिक विजय; पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतून काँग्रेस हद्दपार

BJP win ZP, Panchayat Samiti Elections : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपच अव्वल!, निकालांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहसिन नक्वीची नवी मागणी! India vs Pakistan मॅच हवी असेल तर तिरंगी मालिका खेळवा; ज्यामध्ये भारत, पाकिस्तान अन्...

SCROLL FOR NEXT